सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे हे दोघं काही वर्षांपूर्वी रिलेशनशीपमध्ये होते. त्या दोघांचं नंतर ब्रेकअप झालं होतं अंकिताने शेअर केलेल्या या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कॉमेंट्स केल्या आहेत. सुशांतचे चाहतेही भावूक झालेले दिसत आहेत. 'पवित्र रिश्ता' या मालिकेत अंकिता आणि सुशांतने एकत्र काम केलं होतं. मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातल्या तरुण- तरुणीची प्रेमकथा या मालिकेमध्ये दाखवण्यात आली होती. या दरम्यान त्यांच्या अफेअरला सुरुवात झाली. तब्बल 6 वर्ष ते एकत्र होते. त्यांच्या लग्नाच्या चर्चांनाही उधाण आलं होतं पण काही कारणाने ते वेगळे झाले.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Sushant Singh Rajput