• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • अंकिता लोखंडे-विकी जैनचा रोमान्स; KISS करत फोटो केला शेअर

अंकिता लोखंडे-विकी जैनचा रोमान्स; KISS करत फोटो केला शेअर

नुकताच अंकिता लोखंडेने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बॉयफ्रेंड विकी जैनसोबत एक रोमॅंटिक फोटो शेअर केला आहे.

 • Share this:
  मुंबई, 21 सप्टेंबर- छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सतत बॉयफ़्रेंड विकी जैनसोबत(Vicky Jain) फोटो शेअर करून चर्चेत असते. मुक्तच अंकिताने विकीसोबत आपला नवा फोटो शेअर केला आहे. फोटोसोबत लिहिलेल्या खास कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
  अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या आपल्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ दोन्हीमुले चर्चेत असते. एकीकडे अंकिताने पुन्हा एकदा 'पवित्र रिश्ता २' मधून एंट्री केली आहे. तर दुसरीकडे बॉयफ्रेंड विकी जैनसोबत आपलं नातं अधिकअधिक दृढ करताना दिसत आहे. अंकिता लोखंडे सतत विकीसोबत वेळ घालवताना दिसून येते. हे दोघेही सतत एकमेकांसोबत सुट्टीचा आनंद घेताना दिसून येतात. तसेच एकमेकांच्या कौटुंबिक कार्यक्रमातही हे दोघे जोडीने उपस्थित असतात. त्यामुळे हे दोघे कधी लग्न करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. (हे वाचा:सर्जरीऐवजी निवडला असा मार्ग; रेमो डिसूजाच्या पत्नीने घटवलं 2 वर्षांत 40 किलो वजन) नुकताच अंकिता लोखंडेने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बॉयफ्रेंड विकी जैनसोबत एक रोमॅंटिक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अंकिता विकी अगदी रोमॅंटिक पद्धतीने एकमेकांना किस करताना दिसून येत आहेत. तसेच अंकिताने या फोटोला एक आकर्षक कॅप्शनही दिलं आहे. या फोटोला कॅप्शन देत तिनं म्हटलं आहे, ' देवाने तुमच्यासाठी ठरवलेल्या लव्हस्टोरीला कधीच कमी लेखू नका. कारण तो तुमच्या असं काही करतो, कि तुम्ही त्याचा कधी विचारही केलेला नसता'. अंकिताच्या या कॅप्शनने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. अंकिता आणि विकीसोबत फारच आनंदी दिसून  येत आहेत. यामध्ये अंकिता पिंक कलरच्या साडीत दिसत आहे. तर विकी तिलाच मॅचिंग पिंक कलरच्या कुर्त्यात दिसून येत आहे. (हे वाचा:Bigg Boss OTT: 'दिव्या अग्रवालमुळे येत होते आत्महत्येचे विचार'; नेहा भसीनची मोठी) अंकिता आणि विकीच्या या फोटोवर चाहत्यांच्या मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. चाहते या जोडीला भरभरून प्रेम देत आहेत. तसेच त्यांच्या जोडीचं कौतुक करत आहेत. ही जोडी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. विकी आणि अंकिता गेली अनेक दिवस एकमेकांना डेट करत आहेत. अंकिता नेहमीच विकीबद्दल सोशल मीडियावर व्यक्त होत असते. तसेच आपलं विकीवर किती प्रेम आहे हेसुद्धा दाखवून देत असते. इतकंच चे तर काही महिन्यांपूर्वी अंकिताने आपण विकिसोबत लग्न करण्याचा विचार करत असल्याचं म्हटलं होतं. मात्र अजूनही याबद्दल काहीही अपडेट्स अंकिताने दिलेलं नाहीय. (हे वाचा:HBD: 'क्यों की' फेम अभिनेत्री रिमी सेननं या कारणामुळे बॉलिवूडला केलं होतं रामराम) याआधी अंकिता दिवंगत अभिनेता सुशांत सिंग रजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघांनीही 'पवित्र रिश्ता' मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. ही ऑनस्क्रीन जोडी ऑफस्क्रीन जोडी बनली होती. ही जोडी चाहत्यांमध्ये खूपच लोकप्रिय झाली होती. मात्र दुर्दैवाने यांचा ब्रेकअप झाला होता. आणि लाखो चाहत्यांच्या भावना दुखावल्या होत्या. आजही चाहते या जोडीलाचं लक्षात ठेवतात. सध्या अंकिता 'पवित्र रिश्ता २' मध्ये झळकत आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: