Home /News /entertainment /

ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात रियाचा भाऊ शौविकच्या अटकेनंतर अंकिता लोखंडेची जळजळीत पोस्ट

ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात रियाचा भाऊ शौविकच्या अटकेनंतर अंकिता लोखंडेची जळजळीत पोस्ट

शौविकच्या अटकेनंतर सुशांतच्या बहिणीनेही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे

    मुंबई, 5 सप्टेंबर : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात (Sushant Singh Rajput Death Case) दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. यादरम्यान सीबीआय, एनसीबी आणि ईडीसह तीन एजेंसी अभिनेत्याच्या मृत्यूचा तपास करीत आहे.  सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर नाकरोटिक्स कंट्रोल ब्युरोने शुक्रवारी रात्री 10 वाजता शौविक चक्रवर्ती (Showik Chakraborty) आणि सॅम्युअल मिरांडा (Samuel Miranda) यांना अटक केली आहे. शौविकच्या अटकेनंतर सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने एक पोस्ट शेअर केली आहे. शौविकच्या अटकेनंतर अंकिताने ही पोस्ट शेअर केल्याचा अंदाज बांधला जात आहे. अंकिता लोखंडेने शौविक आणि सॅम्युअलच्या अटकेनंतर ओमचं पोस्टर शेअर केलं आहे. यावर तिने कमेंट केली आहे, तिने लिहिलं आहे - 'हर हर महादेव. सत्यमेव जयते. सत्य जिंकलं आहे. जस्टिस फॉर सुशांत.' अंकिताच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आणि शौविकच्या अटकेवर आनंद व्यक्त केला आहे. यामध्ये सुशांत सिंह राजपूत याची बहीण श्वेता सिंह कीर्तीेनेदेखील शौविक आणि सॅम्युअल याच्या अटकेनंतर प्रतिक्रिया दिली आहे. आणि एनसीबीच्या कारवाईवर आनंद व्यक्त केला आहे. दुसरीकडे बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या घरी पुन्हा एकदा सीबीआयची टीम दाखल झाली आहे. शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास सीबीआयची दोन पथकं वांद्रे येथील कार्टर रोड येथील माऊंट ब्लॅक या इमारतीतील सुशांतच्या घरात पोहोचली आहेत. सीबीआयनं दिलेल्या माहितीनुसार, सुशांत राहात होता त्या इमारतीतील रहिवाशांची चौकशी होणार आहे. तसेच सुशांतच्या आत्महत्येचे पुन्हा एकदा नाट्य रुपांतर केलं जाईल, असंही सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Sushant sing rajput

    पुढील बातम्या