Home /News /entertainment /

अंकिता लोखंडेने शेअर केला आपल्या नव्या घराच्या 'कन्स्ट्रक्शन साईट'चा फोटो;म्हणाली'होम स्वीट होम'

अंकिता लोखंडेने शेअर केला आपल्या नव्या घराच्या 'कन्स्ट्रक्शन साईट'चा फोटो;म्हणाली'होम स्वीट होम'

अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या बिजनेसमॅन विकी जैनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

    मुंबई, 13ऑक्टोबर- 'पवित्र रिश्ता' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे(Ankita Lokhande) होय. अंकिता सतत सोशल मीडियावर आपल्या खाजगी गोष्टी शेअर करत असते. नुकताच अंकिताने आपल्या घराच्या कन्स्ट्रक्शन साईटचे फोटो शेअर केले आहेत. अंकिताच्या या नव्या घराची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अंकिता लोखंडेने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीला आपल्या नव्या घराच्या कन्स्ट्रक्शन साईटचे फोटो शेअर केले होते. अभिनेत्री सध्या स्वतः साठी नवीन घरटं तयार करताना दिसत आहे. यावरूनच तिच्या यशाची प्रचिती सर्वांना येते. अंकिताने आपल्या स्टोरीला शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या नव्या घराचं काम चालू असलेलं दिसत. यामध्ये एक मोठा हिरव्या रंगाचा दरवाजा दिसून येत आहे. तसेच त्याच्या जवळच कामगार काम करताना दिसत आहे. या घराचं काम पूर्ण झालेलं नाहीय. आजही काम सुरु आहे. लवकरच अंकिता आपल्याला या आपल्या स्वप्नाच्या घरट्यात राहताना दिसली तर नवल नको वाटायला. अभिनेत्रीने फोटो शेअर करत 'होम स्वीट होम' म्हटलं आहे. यावरून ती किती एक्सईट आहे हे दिसून येत. (हे वाचा:OMG! शाहीरने LEAK केलं सीक्रेट; अंकिता लोखंडे लवकरच विकीसोबत करणार ... ) अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या बिजनेसमॅन विकी जैनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. हे दोघेही एकमेकांसोबत बराच वेळ घालवत असतात. सतत सोबत सुट्टीचा आनंद घेताना दिसतात. इतकंच नव्हे तर ए दोघे एकमेकांच्या प्रत्येक फॅमिली फंक्शनमध्ये आवर्जून सहभागी होतात. त्यामुळे हे दोघजई लवकरच लग्न करणार असल्याचं म्हटलं जातं मात्र तारखेबद्दल किंवा लग्नाच्या प्लॅनबद्दल अभिनेत्रीने अजूनही कोणताच खुलासा केलेला नाही. अंकिता आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वर सतत विकिसोबत आले रोमँटिक फोटो शेअर करत असते. याआधी अंकिता दिवंगत अभिनेता सुशांत सिंह रजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र सुशांतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिताने स्वतःला सावरत आपल्या आयुष्याचा नवा प्रवास सुरु केला आहे. अंकिता विकिसोबत फारच खुश दिसून येते. (हे वाचा:अंकिता लोखंडे-विकी जैनचा रोमान्स; KISS करत फोटो केला शेअर – News18 ... ) अंकिता लोखंडे सध्या 'पवित्र रिश्ता २' मधून आपल्या भेटीला आली आहे. ती सतत सेटवरील विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. पवित्र रिश्ता मालिकेने अंकिता लोखंडे सुशांत सिंह रजपूतला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती.या दोघांनी मालिकेत मानव आणि अर्चनाच्या रूपात सर्वांचं मन जिंकलं होतं. इथूनच ही रील जोडी रियल लाईफ जोडी बनली होती. सध्या पवित्र रिश्ता २ मध्ये अभिनेता शाहीर शेख मानव अर्थातच सुशांत सिंह रजपूतच्या जागी आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Ankita lokhande, Entertainment

    पुढील बातम्या