Home /News /entertainment /

मिस्टर अँड मिसेस जैन! अंकिता लोखंडेचा बेडरूम VIDEO होतोय VIRAL

मिस्टर अँड मिसेस जैन! अंकिता लोखंडेचा बेडरूम VIDEO होतोय VIRAL

प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) नुकतंच लग्नाच्या बेडीत अडकली. तिच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. लग्नाचे आणि आता लग्नानंतरचेसुद्धा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

  मुंबई, 17 डिसेंबर-   प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे   (Ankita Lokhande)   नुकतंच लग्नाच्या बेडीत अडकली. तिच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. लग्नाचे आणि आता लग्नानंतरचेसुद्धा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. अंकिताने नुकताच एक व्हिडीओ   (Viral Video)  शेअर केला आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अंकिता लोखंडेने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ फारच रोमँटिक आहे. यामध्ये अंकिता लोखंडे पती विकी जैनसोबत रील बनवताना दिसून येत आहे. यामध्ये अंकिता आणि विकीनं पांढऱ्या रंगाचा नाईट ड्रेस घातला आहे.हा नाईट ड्रेस खास बनवून घेण्यात आला आहे. कारण यावर मिस्टर अँड मिसेस जैन असं लिहिलं आहे. अंकिताने हा व्हिडीओ शेअर करत गोड कॅप्शनही दिलं आहे. अंकिताचा हा बेडरूम व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांसोबतच तिचे कलाकार मित्रसुद्धा प्रचंड कमेंट्स करत आहेत.
  अंकिता लोखंडे काल लग्नानंतर पहिल्यांदाच आपल्या पतीसोबत मीडियासमोर आली होती. तसेच त्यांनी मीडियासमोर रोमँटिक पोजही दिल्या. यावेळी अंकिताने निळ्या रंगाची डिझायनर साडी घातली होती. हातात लाल चुडा आणि भांगेत कुंकू भरून ही नवी नवरी सर्वच लक्ष वेधून घेत होती. तर पती विकी जैननं फिकट निळ्या रंगाचा शर्ट आणि काळी पॅन्ट घातली होती. या दोघांची जोडी फारच शोभून दिसत होती. (हे वाचा:लग्नानंतर पहिल्यांदाच पतीसोबत मीडियासमोर आली अंकिता लोखंडे! ट्रॅडिशनल लूकने....) गेली चार दिवस अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या लग्नाचे कार्यक्रम सुरु होते. अभिनेत्रीने आपल्या लग्नाआधीच्या प्रत्येक क्षणाचा मनमुरादपणे आनंद लुटला आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रींच्या मुहूर्तमेढपासून ते हळदी आणि मेहंदी पर्यंतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटो आणि व्हिडीओमध्ये अंकिता आणि विकी आपल्या मित्रांसोबत मोठी धम्माल करताना दिसून आले होते. या प्रत्येक कार्यक्रमात अंकिताची खास मैत्रीण आणि मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरनेही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. तसेच अंकितासोबत पवित्र रिश्ता २ मध्ये काम करत असलेली अभिनेता अभिज्ञा भावेसुद्धा अभिनेत्रीच्या या खास प्रसंगी सहभागी झाली होती. तर तिच्या संगीत सेरेमनीमध्ये बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने धम्माल केली होती.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Ankita lokhande, Entertainment

  पुढील बातम्या