Home /News /entertainment /

सुशांतसाठी अंकितानं नाकारली होती 'बाजीराव मस्तानी'ची ऑफर, कारण सांगताना झाली भावुक

सुशांतसाठी अंकितानं नाकारली होती 'बाजीराव मस्तानी'ची ऑफर, कारण सांगताना झाली भावुक

मुलाखतीदरम्यान अंकितानं (Ankita Lokhande) सुशांतसोबतच्या (Sushant Singh Rajput) आपल्या काही आठवणींना उजाळा दिला आहे. इतकंच नाही तर अभिनेत्रीनं असंदेखील म्हटलं आहे, की तिनं अनेक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या आहेत.

    मुंबई 23 मार्च : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला (Sushant Singh Rajput Suicide) आता जवळपास नऊ महिने होऊन गेले आहेत. मात्र, तरीही त्याचे चाहते आणि काही जवळचे व्यक्ती ही घटना विसलेले नाही. सुशांतच्या निधनाचं दुःख जितकं त्याच्या कुटुंबाला झालं तितकंच अभिनेत्री अंकिता लोखंडेलाही (Ankita Lokhande) . अंकिता आणि सुशांतचा अनेक वर्षांपूर्वीच ब्रेकअप झाला असला तरीही अभिनेत्री त्याच्या आठवणीत आजही भावुक होते. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्रीनं सुशांतसोबतच्या आपल्या काही आठवणींना उजाळा दिला आहे. इतकंच नाही तर अभिनेत्रीनं असंदेखील म्हटलं आहे, की सुशांतसोबत लग्न करण्यासाठी तिनं अनेक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या आहेत. बॉलिवूड बबलला दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना अंकितानं सांगितलं, की तिनं शाहरुख खानच्या हॅप्पी न्यू ईअर तसंच संजय लिला भन्साळीद्वारा दिग्दर्शित बाजीराव मस्तानी (Ankita Lokhande Rejected Offer of Bajirao Mastani) आणि गोलियों की रासलीला या सिनेमांना केवळ सुशांतमुळे नकार दिला. कारण तिची अशी इच्छा होती की आधी सुशांतचं काहीतरी चांगलं व्हावं. रिपोर्टनुसार, अंकितानं म्हटलं, की मी अनेक गोष्टी सोडल्या. मी हॅप्पी न्यू ईअर सिनेमाची ऑफरही नाकारली. अंकिता म्हणाली, मला आजही आठवतं जेव्हा फराह मॅमनं मला या सिनेमाची ऑफर दिली तेव्हा एका कामानिमित्त मी शाहरुख सरांना भेटले. या भेटीदरम्यान शाहरुख खाननं मला सांगितलं, की मी तुला बेस्ट डेब्यू देण्याचा प्रयत्न करेल. मात्र, मी नेहमी प्रार्थना करत राहिले की माझं चांगलं होऊ न होऊ पण त्याचं चांगलं होऊ दे. एक मुलगी नेहमी आपल्या जोडीदाराचं चांगलं व्हावं यासाठी प्रयत्न करते. अंकितानं पुढे सांगितलं, की पुढे पुन्हा माझ्यासोबत असंच झालं. संजय लिला भन्साळींनी मला बाजीराव मस्तानी आणि गोलियों की रासलीला राम लीला या सिनेमांची ऑफर दिली. अंकिता म्हणाली, मला आजही आठवतं की संजय सरांनी मला बोलावलं आणि म्हणाले, बाजीराव मस्तानीमध्ये काम कर नाहीतर लक्षात ठेव तुला पश्चाताप होईल. मात्र, मी त्यांना म्हणाले, की नाही सर, मला लग्न करायचं आहे आणि यानंतर त्यांच्याकडे बोलायला काहीच नव्हतं. अंकिताच्या म्हणण्यानुसार, भन्साळी अंकिताचं कौतुक करत होते. तिच्या म्हणण्यानुसार खासगी आयुष्य आणि काम यात संतुलन राखणं फार महत्त्वाचं आहे. या दोघांची जोडी पवित्र रिश्ता या मालिकेत एकत्र झळकली आणि जोडीला विशेष पसंतीही मिळाली. पुढे ही जोडी रिअल लाईफमध्येही लोकांच्या पसंतीस उतरली. मात्र, सात वर्ष रिलेशनशिपमध्ये राहूनही सुशांत आणि अंकिता एकमेकांचे होऊ शकले नाहीत आणि त्यांचा ब्रेकअप झाला. अंकितानं मणिकर्णिका या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं तेव्हा सुशांतनं अतिशय प्रेमानं तिचं अभिनंदन केलं होतं.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Ankita lokhande, Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या