Home /News /entertainment /

ब्रेकअपनंतरही सुशांतचे फोटो घरात ठेवले होते कारण... अंकिताने केला खुलासा

ब्रेकअपनंतरही सुशांतचे फोटो घरात ठेवले होते कारण... अंकिताने केला खुलासा

सुशांतपासून विभक्त झाल्याच्या अनेक वर्षांनंतरही अंकिताने सुशांतचे फोटो घरात लावले होते. 'अनेकांनी मला फोटो काढून टाकण्याचाही सल्ला दिला, पण मी ते ठेवले', असं ती सांगते

    मुंबई, 24 मार्च : अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या रिलेशनशिपबद्दल काही लपलेलं नव्हतं. त्यांचं नातं जगजाहीर होतं, तसं त्यांचं ब्रेकअपसुद्धा लगेचच जगासमोर आलं होतं. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर अंकिताही चर्चे आली होती. नुकत्याच एका मुलाखतीत अंकिताने तिचे सुशांतबरोबरचे संबंध कसे होते याविषयी तिने मोकळेपणाणे सांगितलं. पूर्वीचा प्रियकर सुशांत सिंग राजपूत विषयी काही गोष्टींचा खुलासा केला आहे. 2016 साली सुशांतपासून विभक्त झाल्यानंतरही अंकिताने स्वतःच्या घरात सुशांतचे फोटो घरात लावलेले होते. तिच्याकडे अजूनही ते फोटो आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने याविषयी सांगितलं. “मला परिस्थिती पासून पळ काढायला आवडत नाही. लोकांनी मला ब्रेकअपनंतर  सुशांतचे फोटो काढून टाकायला सांगितले, पण मला या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी वेळ हवा असल्याचं मी सांगितलं” अंकिता म्हणाली. 'पवित्र रिश्ता' या लोकप्रिय मालिकेतून सुशांत आणि अंकिता दोघांनीही आपल्या करिअरला सुरुवात केली होती आणि या मालिकेमुळेच त्यांची ओळख आणि मैत्रीही झाली. मालिकेतील अर्चना-मानव ही पात्रं तुफान गाजली होती. पण त्यांनतर सुशांतने मधेच मालिका सोडण्याचा निर्णय घेत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'काम हवं असेल तर माझ्याबरोबर झोप' अंकिता लोखंडेचा खळबळजनक गौप्यस्फोट सुशांतचे फोटो घरात ठेवण्याचा आणखीही एक उद्देश असल्याचं अंकिता सांगते. “सुशांतचे फोटो घरात असल्याने त्यांनंतर जेव्हा कधी तो माझ्या समोर यायचा त्याला सामोरं जाणं सोपं व्हायचं. मला माझा वेळ हवा आहे. मी परिस्थिती पासून पळ काढणाऱ्यातली नाही. मी अडीच वर्षं त्या फोटोंसोबत राहिले. मी माझं जीवन त्यांच्यासोबत जगले. मी रोज त्या फोटोंना नजर भिडवत होते जेणेकरून जेव्हा कधी सुशांत माझ्या समोर येईल मी त्याचा धीराने सामना करू शकेन. आणि हीच माझी विचार करण्याची पद्धत आहे.” अंकिताने स्पष्ट केलं. यांनंतर अंकिताने तिच्या आयुष्यात असा क्षण आला जेव्हा हे फोटो काढण्याची वेळ आली आणि ही जागा आणखी कोणीतरी घेतली, असंही ती म्हणाली. अंकिता सध्या विकी जैन बरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. सुशांतशी ब्रेकअप झाल्यानंतर आपण अतिशय कठीण काळातून गेल्याचंही तिने म्हटलं. आपल्याही मनात आत्महत्येसारखे विचार आले होते. पण कुटुंबीयांच्या पाठिंब्याने मी यातून बाहेर पडल्याचंही तिने स्पष्ट केलं. अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेव्यतिरिक्त मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाँसी, बागी 3 या चित्रपटांमधे काम केलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ankita lokhande, Sushant sing rajput

    पुढील बातम्या