सुशांतच्या आठवणीने उषा नाडकर्णी भावुक; अंकिता लोखंडेने शेअर केला भेटीचा VIDEO

अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) यांची नुकतीच भेट झाली. तिने भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) यांची नुकतीच भेट झाली. तिने भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • Share this:
    मुंबई, 05 डिसेंबर: सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) आधीची गर्लंफ्रेंड अंकिता लोखंडे (Ankita Lokhande)  सध्या झी रिश्ते Awards 2020 मध्ये व्यस्त आहे. या कार्यक्रमामध्ये ती एका गाण्यावर डान्स करणार आहे. हे गाणं तिने सुशांत सिंहला डेडिकेट केलेलं आहे. त्याचदरम्यान अंकिता लोखंडे आणि ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) यांची भेट झाली. पवित्र रिश्ता (Pavitra Rishta) या मालिकेत उषा नाडकर्णी आणि अंकिता लोखंडे यांनी एकत्र काम केलं होतं. या भेटीचा एक व्हिडीओ अंकिता लोखंडेनं शेअर केला आहे. अंकिता लोखंडे आणि उषा नाडकर्णी यांची बऱ्याच वर्षांनी भेट झाली. तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती लिहीते, ‘आईला बऱ्याच वर्षांनी भेटले. त्या दिवसेंदिवस जास्तीच तरुण दिसायला लागल्या आहेत. एकदम कडक आई.’
    ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी आणि अंकिता लोखंडे बऱ्याच वर्षांनी भेटल्या. त्यामुळे त्यांच्यात बऱ्याच गप्पा रंगल्या. पवित्र रिश्ता या मालिकेतील जुन्या आठवणी काढून दोघींनाही बरं वाटलं. सुशांतच्या आठवणीमुळे उषा नाडकर्णी यांचे डोळेही पाणावले. पवित्र रिश्ता या मालिकेत उषा नाडकर्णी यांनी अंकिता लोखंडेच्या सासूची भूमिका साकारली होती. दोघींच्याही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या. त्यानंतर मात्र दोघींनी ऑनस्क्रीन काम केलं नाही. पण त्यांच्या अजूनही चांगलं बॉडिंग असल्याचं या व्हीडीओमधून दिसून येत आहे.
    Published by:Amruta Abhyankar
    First published: