मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अंकिताने पहिल्यांदाचं केली कोरोना चाचणी; पाहा 'पवित्र रिश्ता 2' सेटवरचा व्हायरल VIDEO

अंकिताने पहिल्यांदाचं केली कोरोना चाचणी; पाहा 'पवित्र रिश्ता 2' सेटवरचा व्हायरल VIDEO

अंकिता लोखंडे सध्या ‘पवित्र रिश्ता 2’ मध्ये व्यग्र आहे. नुकताच मालिकेच्या शुटींगला सुरुवात झाली आहे.

अंकिता लोखंडे सध्या ‘पवित्र रिश्ता 2’ मध्ये व्यग्र आहे. नुकताच मालिकेच्या शुटींगला सुरुवात झाली आहे.

अंकिता लोखंडे सध्या ‘पवित्र रिश्ता 2’ मध्ये व्यग्र आहे. नुकताच मालिकेच्या शुटींगला सुरुवात झाली आहे.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 15 जुलै- ‘पवित्रा रिश्ता 2’ (Pavitra Rishta 2) मुळे सध्या अंकिता लोखंडे खुपचं चर्चेत आहे. नुकताच या मालिकेच्या शुटींगलादेखील सुरुवात झाली आहे. सेटवरील विविध फोटो आणि व्हिडीओ सध्या व्हायरल होतं आहेत. नुकताच अंकिताने ‘पवित्र रिश्ता 2’ च्या सेटवरील एक व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये अंकिता (Ankita Lokhande) पहिल्यांदा कोरोना चाचणी करताना दिसत आहे. अंकिताने व्हिडीओला (Share Video) कॅप्शन देत माय फर्स्ट कोरोना टेस्ट असं म्हटलं आहे.
अंकिता लोखंडे सध्या ‘पवित्र रिश्ता 2’ मध्ये व्यग्र आहे. नुकताच मालिकेच्या शुटींगला सुरुवात झाली आहे. तसेच मालिकेतील सर्वांचे लुकसुद्धा समोर आले आहेत. सतत सोशल मीडियावर मालिकेच्या सेटवरील फोटो आणि व्हिडीओ समोर येत आहेत. नुकताच अंकिताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये सेटवर कोरोना चाचणी सुरु असल्याचं दिसत आहे. अंकिताचीसुद्धा चाचणी केली जात आहे. अंकिताची ही पहिलीचं कोरोना चाचणी आहे. अंकिताने स्वतः आपल्या कॅप्शनमध्ये याचा उल्लेख केला आहे. (हे वाचा: संजीवनी रणजीतच्या हातात घालणार बेड्या; 'राजा राणी..' मध्ये येणार मोठा ट्वीस्ट ) 12 वर्षांपूर्वी आलेल्या ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका खुपचं लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील अर्चना आणि मानवच्या जोडीला खुपचं पसंत केलं जातं. होतं अर्चना आणि मानव म्हणजेच सुशांत आणि अंकिता रील ते रियल लाईफ कपल बनले होते. त्यांची रील आणि रियल जोडी चाहत्यांना खुपचं पसंत पडली होती. आत्ता पुन्हा एकदा ‘पवित्र रिश्ता’ चाहत्यांसाठी परतलं आहे. यामध्ये अर्चना अभिनेत्री अंकिता लोखंडेचं साकारत आहे. तर मानवच्या भूमिकेसाठी अभिनेता शाहीर शेखला घेण्यात आलं आहे. याआधी ही भूमिका अभिनेता सुशांत सिंह राजपूतने साकारली होती. तर त्यांनतर अभिनेता हितेन तेजवानीने साकारली होती. मात्र सुशांत सिंह राजपूत प्रचंड लोकप्रिय झाला होता.
First published:

Tags: Ankita lokhande, Entertainment

पुढील बातम्या