VIDEO - स्टेजवर चक्कर येऊन पडली अंकिता; दूर असलेल्या सुशांतची अशी झालेली अवस्था

VIDEO - स्टेजवर चक्कर येऊन पडली अंकिता; दूर असलेल्या सुशांतची अशी झालेली अवस्था

अंकिता लोखंडेला (ankita lokhande) चक्कर आली तेव्हा सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) तिच्या जवळ नव्हता.

  • Share this:

मुंबई, 10 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant singh rajput) आत्महत्येनंतर त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे (ankita lokhande) आणि त्याचे बरेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलेत. पवित्र रिश्तामधील मानव अर्चनाचीही ही जोडी प्रत्यक्ष आयुष्यातही लोकांना आवडू लागली. ते दोघंही एकमेकांच्या जवळ आले. त्याच वेळी त्यांनी एका रिअॅलिटी डान्स शोमध्ये भागही घेतला होता आणि याचदरम्यानचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

'झलक दिखला जा' या कार्यक्रमात सुशांत आणि अंकिताची जोडी होती. यामध्ये अंकिता परफॉर्म करताना दिसते आहे. डान्स करता करता अंकिता अचानक स्टेजवरच चक्कर येऊन पडते. तेव्हा सुशांत तिच्याजवळ नव्हता. तो तिच्यापासून दूर इतर स्पर्धकांमध्ये बसला होता. सुशांतची त्यावेळी काय अवस्था झाली होती, ते या व्हिडीओतून दिसून येईल.

अंकिता जोमानं आपला डान्स पूर्ण करते. डान्स संपल्यानंतर ती अचानक स्टेजवर खालीच बसते. पुन्हा उठून उभी राहते मात्र त्यावेळी तिला चक्कर येते. त्यावेळी इतर स्पर्धकांमध्ये बसलेला सुशांत अस्वस्थ होतो. अंकिताला असं पाहून तो उभा राहतो, त्याची बैचेनी त्याच्या चेहऱ्यावर पूर्णपणे दिसून येते. अंकिताबाबतची चिंता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येते. जेव्हा अंकिता स्टेजवर पुन्हा उभी राहते आणि आपल्याला बरं वाटतं आहे, असं ती सांगते. तेव्हा सुशांतला कुठेतरी हायसं वाटतं.

हे वाचा - 'दिल बेचारा'चे टायटल ट्रॅक प्रदर्शित, हे गाणं ठरणार सुशांतचा शेवटचा डान्स

2009 साली पवित्रा रिश्ता या मालिकेत सुशांत आणि अर्चना एकत्र आले. मालिकेतील मानव-अर्चना या जोडीने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. पण प्रत्यक्ष आयुष्यातही ही जोडी लोकांच्या पसंतीस उतरली. यानंतर अंकिता आणि सुशांत दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. जवळपास सहा वर्षे ते एकत्र होते. मात्र नंतरच्या काळात काही मतभेद झाले आणि सुशात-अंकिता यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि चाहत्यांनाही ते आवडलं नाही.

जेव्हा सुशांत आणि अंकिताचा ब्रेकअप झाला तेव्हा बर्‍याच बातम्या समोर आल्या होत्या. या बातम्यांना उत्तर देताना सुशांतने स्वत: असे म्हटले होते की, नाही अंकिता मद्यपी आहे, नाही मी वुमेनायजर आहे. ब्रेकअप करण्याचे कारण सांगून तो म्हणाला की - 'लोक फक्त एकमेकांपासून दूर जातात .. आणि हे खूप दुर्दैवी आहे'. त्यानंतर सुशांत बराच काळ खचलेल्या मानसिकतेत गेला होता.

हे वाचा - सुशांतच्या आत्महत्येनंतर अंकिता लोखंडेचा बॉयफ्रेंड ट्रोल; आता घेतला हा निर्णय

सुशांतसह नातं तुटल्यानंतर अंकिता बिझनेसमन विकी जैनसह रिलेशनशिपमध्ये आली. सुशांतच्या आत्महत्येनंतर अंकिताला मोठा धक्का बसला आहे. सध्या अंकिता सोशल मीडियापासून दूरच आहे. सुशांतच्या आत्महत्येच्या दुसऱ्या दिवशी ती सुशांतच्या मुंबईतील घरी त्याच्या कुटुंबाला भेटायला गेली तेव्हा ती शेवटची दिसली होती.

Published by: Priya Lad
First published: July 10, 2020, 7:14 PM IST

ताज्या बातम्या