मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अंकिता लोखंडेनं Mrs. Jain बनून साजरा केला पहिला वाढदिवस! विकीनं मध्यरात्री दिलं सरप्राईज

अंकिता लोखंडेनं Mrs. Jain बनून साजरा केला पहिला वाढदिवस! विकीनं मध्यरात्री दिलं सरप्राईज

अंकिता लोखंडे   (Ankita Lokhande)  आज लग्नानंतरचा तिचा सर्वात खास दिवस साजरा करत आहे. अंकिता लोखंडेपासून मिसेस जैन बनलेली अंकिता आज तिचा 36 वा वाढदिवस    (Ankita Lokhande 36 th Birthday)   साजरा करत आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई,19  डिसेंबर-   अंकिता लोखंडे   (Ankita Lokhande)  आज लग्नानंतरचा तिचा सर्वात खास दिवस साजरा करत आहे. अंकिता लोखंडेपासून मिसेस जैन बनलेली अंकिता आज तिचा 36 वा वाढदिवस    (Ankita Lokhande 36 th Birthday)   साजरा करत आहे. लग्नानंतरचा हा तिचा पहिला वाढदिवस आहे, ती तिच्या सासरच्या घरी हा खास दिवस साजरा करत आहे. मध्यरात्री अंकितानं पती विकी जैन   (Vicky Jain), कुटुंब आणि मित्रांसोबत उत्साहात वाढदिवस साजरा केला. पती विकी जैननंही अंकितासाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे १४ डिसेंबरला लग्नबंधनात अडकले. लग्नाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद लुटल्यानंतर विकीला त्याची पत्नी अंकिताचा हा खास दिवस आणखी खास बनवायचा होता. म्हणूनच त्यानं मध्यरात्री सोशल मीडियावर फक्त एक खास पोस्टच शेअर केली नाही, तर कुटुंब आणि मित्रांसोबत जोरदार सेलिब्रेशनही केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Elfaworld (@elfaworld)

अंकिता लोखंडेनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सेलिब्रेशनचे काही खास फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. अंकिता ट्रॅकसूटमध्ये केक कापताना दिसत आहे. त्यातील एका केकवर 'मिसेस जैन' असं लिहिलं आहे. विकी अंकितासाठी हॅप्पी बर्थडे गाणंही गाताना दिसत आहे.अंकिताच्या वाढदिवसाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सेलिब्रेशनमध्ये अंकिताची आई, बहिणी आणि सोबतच तिची मैत्रिण आणि टीव्ही अभिनेत्री आशिता धवनही दिसत आहे.

विकी जैननं आपल्या इन्स्टाग्रामवर अंकितासोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये विकी आणि अंकिता एका रोमँटिक पोजमध्ये आहेत . या फोटोमध्ये सनसेट होताना दिसत आहे. फोटोमध्ये दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले दिसत आहेत. हा फोटो शेअर करत विकीनं कॅप्शन लिहिलं आहे- 'हॅप्पी बर्थडे मिसेस जैन'.

(हे वाचा: Ankita-Vicky Wedding: अंकिता लोखंडे- विकी जैनसोबत अडकली विवाहबंधनात)

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन मुंबईतील ग्रँड हयात या आलिशान हॉटेलमध्ये विवाहबंधनात अडकले. 11 डिसेंबरच्या रात्री पासूनच अंकिता आणि विकीच्या विवाहसोहळ्याला सुरुवात झाली होती. मेहेंदी, हळदी, एंगेजमेंटपासून भव्य कॉकटेल पार्टीपर्यंत सर्व कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले आहेत. या सोहळ्यांना कुटुंबातील सदस्य, मित्र आणि सिनेइंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती.या विवाह सोहळ्यात विकी जैननं ग्रँड एन्ट्री केली होती. नववधू अंकिता लोखंडेला घेण्यासाठी तो विंटेज कारमधून मिरवणुकीने पोहोचला होता.

First published:

Tags: Ankita lokhande, Entertainment