Home /News /entertainment /

Ankita Lokhande नं साजरी केली लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत, हळदी-कुंकूचा VIDEO होतोय VIRAL

Ankita Lokhande नं साजरी केली लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत, हळदी-कुंकूचा VIDEO होतोय VIRAL

अभिनेत्री अंकिता लोखंडेनंसुद्धा (Ankita Lokhande) लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत आपल्या कुटुंबासोबत आणि जवळच्या मैत्रिणीसोबत साजरी केली आहे.

  मुंबई, 15 जानेवारी-   सणासुदीला सर्वत्र उत्साहाचं वातावरण असतं. सर्व लोक एकत्र येऊन सणाचा आनंद घेतात. परंतु सध्याच्या कोरोना पसरिस्थितीमध्ये या सर्व गोष्टींवर काहीशा मर्यादा आल्या आहेत. त्यामुळेच कालचा मकरसंक्रांतीचा   (Makar Sankranti 2022)  सण सर्वांनीच आपल्या कुटुंबा उत्साहात साजरा केला. अभिनेत्री अंकिता लोखंडेनंसुद्धा   (Ankita Lokhande)  लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत आपल्या कुटुंबासोबत आणि जवळच्या मैत्रिणीसोबत साजरी केली आहे. तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काल सर्वत्र मोठ्या उत्साहात मकर संक्रांत साजरी करण्यात आली. सर्वसामान्य लोक असो किंवा कलाकार सर्वांनी पारंपरिक थाटात हा सण पार पाडला. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. अंकिता लोखंडेच्या लग्नानंतरची ही पहिली संक्रांत होती. त्यामुळे हा सण तिच्यासाठी फारच खास होती. सध्या अंकिता लोखंडेने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती आपल्या कुटुंबातील स्त्रियांसोबत हळदी-कुंकूचा करताना दिसून येत आहे. महाराष्ट्रामध्ये मकर संक्रातीला महिला मंडळी हळदी-कुंकूचा कार्यक्रम करतात.
  View this post on Instagram

  A post shared by Voompla (@voompla)

  या व्हिडीओमध्ये अंकिता लोखंडेने काळया आणि लाल रंगाची पारंपरिक काठपदर साडी नेसली आहे. इतकंच नव्हे तर अभिनेत्रीने सुंदर असे हलव्याचे दागिने घातले घातले आहेत. त्याचबरोबर अंकिताच्या हातात हिरवागार चुडा आहे. अभिनेत्री या व्हिडीओमध्ये आईसोबत आपली मैत्रीण आणि अभिनेत्री अशिता धवनला वहाण देताना दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये सर्वजण फारच उत्सहात दिसून येत आहेत.voompla नं एक व्हिडीओ शेअर केला आहे. अगदी मराठमोळ्या पद्धतीने सर्व चालीरीतींप्रमाणे हा उत्सव अंकिताने साजरा केला आहे. अंकिता हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करणारी एक महाराष्ट्रीयन मुलगी आहे. ती सर्व मराठमोळे सण फारच उत्साहात साजरे करते. (हे वाचा:येऊ कशी तशी..' मालिकेत नवी एन्ट्री! 'दिल दोस्ती..' मध्ये साकारलीय भूमिका ) अंकिता लोखंडेनं आपला बॉयफ्रेंड विकी जैनसोबत गेल्या महिन्यात लग्न केलं आहे. त्यांच्या लग्नाला आता जवळजवळ महिना झाला आहे. मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अगदी राजेशाही थाटात या दोघांनी लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या हळदीपासून ते रिसेप्शनपर्यंतचे सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यांच्या लग्नाची फारच चर्चा रंगली होती. या दोघांनी प्रत्येक कार्यक्रम फारच रॉयल पद्धतीने पार पाडला. या दोघांच्या वेडिंग लूकचीसुद्धा मोठी चर्चा झाली होती.अभिनेत्रीने लग्नात मनीष मल्होत्राचा डिझायनर लेहेंगा परिधान केला होता.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Ankita lokhande, Entertainment, Makar Sankranti

  पुढील बातम्या