Home /News /entertainment /

अंकिता लोखंडेने रिसेप्शन केलं रद्द; हनिमूनदेखील पुढे ढकलावं लागलं, जाणून घ्या कारण...

अंकिता लोखंडेने रिसेप्शन केलं रद्द; हनिमूनदेखील पुढे ढकलावं लागलं, जाणून घ्या कारण...

अंकिता लोखंडे आणि विक्की जैन (Ankita Lokhande and Vicky Jain) दोघंही विवाह बंधनात अडकले आहेत. दोघांनी 14 डिसेंबर रोजी शादी पद्धतीने मुंबईतील एका लग्झरी हॉटेलमध्ये लग्न केलं.

    मुंबई, 17 डिसेंबर : अंकिता लोखंडे आणि विक्की जैन (Ankita Lokhande and Vicky Jain) दोघंही विवाह बंधनात अडकले आहेत. दोघांनी 14 डिसेंबर रोजी शादी पद्धतीने मुंबईतील एका लग्झरी हॉटेलमध्ये लग्न केलं. लग्नातील झगमगाट पाहून त्याच्या शादी पद्धतीचा अंदाजा लावता येईल. केवळ लग्न नाही तर लग्नाशी संबंधित अनेक विधी चर्चेत होते. लग्नानंतर दाम्पत्याने इंडस्ट्रीच्या लोकांसाठी एक शानदार रिसेप्शन आयोजित केलं होतं. या रिसेप्शनमध्ये इंडस्ट्रीतील अनेक लोक सामील झाले होते. मोठ मोठे सेलिब्रिटी यावेळी सहभागी झाले होते. नवदाम्पत्यांनी दोन रिसेप्शन देण्याचं प्लानिंग केलं होतं. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी आयोजित केलेलं दुसरं रिसेप्शन होणार नसल्याची माहिती मिळत आहे. इतकी तयारी केल्यानंतर रिसेप्शन रद्द झाल्यामुळे सर्वंजण हैराण झाले. हे रिसेप्शन त्यांनी जवळच्या नातेवाईक व मित्रमंडळींसाठी ठेवलं होतं. रायपूरमध्ये दुसरं रिसेप्श आयोजित करण्यात आले होते. मात्र कोरोनाची वाढती रुग्णसंख्येमुळे आता हे रिसेप्शन रद्द करण्यात आले आहे. हे ही वाचा-गोड सुरुवात! कतरिना कैफनं पती विकीसाठी बनवला शिरा, फोटो शेअर करत व्यक्त केला.... सध्या इंडस्ट्रीत कोरोनाचे अनेक रुग्ण समोर आले आहेत. करीना कपूर खान ते संजीव कपूर यांची मुलगी शनाया कपूरपर्यंत अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. अशा वेळेत नव विवाहित दाम्पत्य काही रिस्क घेऊ इच्छित नाही. रिसेप्शनची संपूर्ण तयारी झाली होती. मात्र कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सर्व तयारीवर पाणी फिरलं. इतकच नाही तर दोघांच्या हनिमून प्लानमध्येही खंड पडल्याचं सांगितलं जात आहे. बॉलिवूड लाईफने एका युट्यूब चॅनेलच्या सूत्रांनुसार, सांगितलं आहे, की विकी जैनने अंकिता लोखंडेला या राजेशाही लग्नात कोट्यवधींची भेट दिली आहे. या रिपोर्टनुसार, विकीने अंकिताला एक खाजगी व्हिला (फार्म हाऊस)भेट म्हणून दिला आहे. मात्र याची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसू शकतो. या व्हीलची किंमत तब्बल ५० कोटी असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच विकीने एक खाजगी बोटसुद्धा खरेदी केली आहे. आणि त्याची किंमत ८ कोटी असल्याचं म्हटलं जात आहे. अंकिता लोखंडे ही एक प्रसिद्ध अभिनेत्री असली तरी तिचा पती विकी जैन हा एक उद्योगपती आहे. तो विलासपूरच्या एका कोळसा उद्योजकाचा मुलगा आहे.त्यामुळे हे लग्न राजेशाही थाटात पार पडणार हे नक्की होतं.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Ankita lokhande, Bollywood, Marriage

    पुढील बातम्या