सुशांतच्या आत्महत्येनंतर अंकिता लोखंडेचा बॉयफ्रेंड ट्रोल; आता घेतला हा निर्णय

सुशांतच्या आत्महत्येनंतर अंकिता लोखंडेचा बॉयफ्रेंड ट्रोल; आता घेतला हा निर्णय

सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) चाहत्यांना अंकिता लोखंडेचा बॉयफ्रेंड (ankita lokhande boyfriend) विकी जैनवरही निशाणा साधला आहे.

  • Share this:

मुंबई, 09 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajpit) आत्महत्येनंतर अनेक बॉलीवूड कलाकारांना ट्रोल तर केलंच जातं आहे. मात्र त्यासह सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या बॉयफ्रेंडवरही (ankita lokhande boyfriend) सुशांतच्या चाहत्यांनी निशाणा साधला आहे. अंकिताचा बॉयफ्रेंड विकी जैनला सुशांतच्या चाहत्यांनी हैराण करून सोडलं आहे. त्यामुळे विकीने एक निर्णय घेतला आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर विकी जैनला त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सुशांतच्या चाहत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्यात. अंकिताला सोडून दे, तू अंकिताच्या लायक नाहीस अशा कमेंट्स त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर येऊ लागल्या. त्यामुळे आता विकीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील कमेंट्सना मर्यादा घातली आहे.

2009 साली पवित्रा रिश्ता या मालिकेत सुशांत आणि अर्चना एकत्र आले. मालिकेतील मानव-अर्चना या जोडीने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. पण प्रत्यक्ष आयुष्यातही ही जोडी लोकांच्या पसंतीस उतरली. यानंतर अंकिता आणि सुशांत दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. जवळपास सहा वर्षे ते एकत्र होते. मात्र नंतरच्या काळात काही मतभेद झाले आणि सुशात-अंकिता यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि चाहत्यांनाही ते आवडलं नाही.

हे वाचा - '...आणि सुशांतला रडू कोसळलं', मुंबई पोलिसांकडे शेखर कपूर यांनी केला हा खुलासा

जेव्हा सुशांत आणि अंकिताचा ब्रेकअप झाला तेव्हा बर्‍याच बातम्या समोर आल्या होत्या. या बातम्यांना उत्तर देताना सुशांतने स्वत: असे म्हटले होते की, नाही अंकिता मद्यपी आहे, नाही मी वुमेनायजर आहे. ब्रेकअप करण्याचे कारण सांगून तो म्हणाला की - 'लोक फक्त एकमेकांपासून दूर जातात .. आणि हे खूप दुर्दैवी आहे'. त्यानंतर सुशांत बराच काळ खचलेल्या मानसिकतेत गेला होता.

 

View this post on Instagram

 

Tell me somethin', girl Are you happy in this modern world? Or do you need more? Is there somethin' else you're searchin' for? I'm falling In all the good times I find myself Longin' for change And in the bad times I fear myself Tell me something, boy Aren't you tired tryin' to fill that void? Or do you need more? Ain't it hard keeping it so hardcore? I'm falling In all the good times I find myself Longing for a change And in the bad times I fear myself I'm off the deep end, watch as I dive in I'll never meet the ground Crash through the surface, where they can't hurt us We're far from the shallow now In the shallow, shallow In the shallow, shallow In the shallow, shallow We're far from… ❤️ @jainvick

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

सुशांतसह नातं तुटल्यानंतर अंकिता बिझनेसमन विकी जैनसह रिलेशनशिपमध्ये आली.  अंकिता आणि विकी कधीतरी एकत्र दिसतात आणि आपले एकमेकांसोबतचे फोटोही ते सोशल मीडियावर शअर करतात. त्या दोघांची एंगेजमेन्टही झाली आहे.

हे वाचा - आलिशान घरंच वाटावं इतकी सुंदर आहे सलमान खानची VANITY; फोटो पाहूनच प्रेमात पडाल

सुशांतच्या आत्महत्येनंतर अंकिताला मोठा धक्का बसला आहे. सध्या अंकिता सोशल मीडियापासून दूरच आहे. सुशांतच्या आत्महत्येच्या दुसऱ्या दिवशी ती सुशांतच्या मुंबईतील घरी त्याच्या कुटुंबाला भेटायला गेली तेव्हा ती शेवटची दिसली होती.

Published by: Priya Lad
First published: July 9, 2020, 7:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading