• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ‘बिग बॉस’मध्ये झळकणार का? नेटकऱ्यांच्या चर्चेवर अखेर अंकिता लोखंडेनं सोडलं मौन

‘बिग बॉस’मध्ये झळकणार का? नेटकऱ्यांच्या चर्चेवर अखेर अंकिता लोखंडेनं सोडलं मौन

अनेकांनी तिला ट्रोल देखील केलं होतं. परंतु या सर्व चर्चेवर आता स्वत: अंकितानं स्पष्टीकरण दिलं. तिनं या चर्चेमागचं सत्य आपल्या चाहत्यांना सांगितलं.

 • Share this:
  मुंबई 28 जून: बिग बॉस (Bigg Boss) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय पण तितकाच वादग्रस्त शो म्हणून ओळखला जातो. या शोमध्ये आतापर्यंत मनोरंजनसृष्टीतील अनेक नामांकित कलाकार झळकले आहेत. बिग बॉसमुळं अनेक कलाकारांना त्यांच्या करिअरमध्ये उंची गाठण्यासाठी मदत झाली आहे. त्यामुळं सेलिब्रिटी याशोमध्ये सामिल होण्यासाठी कायम उत्सुक असतात. यावेळी बिग बॉसमध्ये अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) झळकणार अशा चर्चा होत्या. यामुळं अनेकांनी तिला ट्रोल देखील केलं होतं. परंतु या सर्व चर्चेवर आता स्वत: अंकितानं स्पष्टीकरण दिलं. तिनं या चर्चेमागचं सत्य आपल्या चाहत्यांना सांगितलं. अंकितानं इन्स्टाग्रामवर याविषयी एक पोस्ट शेअर केली आहे. “बिग बॉस' च्या १५ व्या पर्वामध्ये मी सहभागी होणार असल्याच्या बातम्या अनेक मीडिया रिपोर्टमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. या सर्व बातम्या खोट्या आणि बिनबुडाच्या आहेत. मी बिग बॉस कार्यक्रमात सहभागी होणार नाही, हे सगळ्यांनी लक्षात घ्यावे. मी बिग बॉसमध्ये सहभागी होण्याच्या बातम्या आल्यानंतर मला सातत्याने द्वेषपूर्ण मेसेज अनेकजण पाठवत आहेत. त्यांनी प्रतिक्रिया देण्यास खूपच घाई केली असे मला वाटते. बिग बॉसमध्ये सहभागी होण्याबाबतच्या ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत, त्या संपूर्ण खोट्या आहेत. त्यावर विश्वास ठेवू नका.” असं स्पष्टीकरण तिनं या पोस्टद्वारे दिलं आहे. टीव्ही अभिनेत्याची ऑनलाईन फसवणूक; दारुचं आमिष दाखवत हजारोंचा गंडा
  इगतपुरी रेव्ह पार्टीत अटक झालेली हिना पांचाळ नेमकी कोण आहे?, जाणून घ्या अंकिता लोखंडे सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड होती. सुशांतच्या मृत्यूनंतर ती अचानक प्रकाशझोतात आली. ती याच प्रसिद्धीचा वापर करुन बिग बॉसद्वारे पैसे कमावण्याचा प्रयत्न करतेय असा आरोप काही लोक तिच्यावर वारंवार करत होते. या ट्रोलर्सला प्रत्युत्तर देण्यासाठी तिनं ही पोस्ट लिहिली आहे. अंकितासोबतच रिया चक्रवर्तीची देखील चर्चा आहे. परंतु तिनं अद्याप यावर स्पष्टीकरण दिलेलं नाही.
  Published by:Mandar Gurav
  First published: