Home /News /entertainment /

बॉलिवूडमधील नेपोटिझमबाबत काय होते सुशांतचे विचार? एक्स गर्लफ्रेंड अंकिताने केला खुलासा

बॉलिवूडमधील नेपोटिझमबाबत काय होते सुशांतचे विचार? एक्स गर्लफ्रेंड अंकिताने केला खुलासा

बिहार पोलीस अंकिता लोखंडे हिच्या घरी स्टेटमेंटसाठी दाखल झाले होते, अशी माहिती आहे.

बिहार पोलीस अंकिता लोखंडे हिच्या घरी स्टेटमेंटसाठी दाखल झाले होते, अशी माहिती आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) मृत्यूप्रकरणी सुरुवातीला त्याच्या बॉलिवूडमधील करिअरवरून चर्चा सुरू होती.

    मुंबई, 31 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. सुरुवातीला या प्रकरणात बॉलिवूड नेपोटिझमवरून (bollywood nepotism) चर्चा सुरू होती आता या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली. सुशांतच्या मृत्यूप्रकरणी त्याचे गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर  त्याचे पैसे लुटल्याचा आरोप लावल्यानंतर आता ईडीने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे आणि आता या दिशेनं तपास सुरू झाला आहे. बॉलिवूड नेपोटिझम असो किंवा पैसा याबाबत सुशांतचे नेमके विचार काय होते, हे कित्येक वर्षे त्याच्या सर्वात जवळ राहिलेली त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने (ankita lokhande) सांगितलं आहे. जोपर्यंत मी सुशांतसह होते, तेव्हा मला तरी त्याच्या करिअरमध्ये काही समस्या दिसली नाही आणि आर्थिक चिंता तर त्याला कधीच नव्हती असं अंकिता सीएएन न्यूज 18 शी बोलताना म्हणाली. अंकिता म्हणाली, "सुशांतला पैशांची काळजी कधीच नव्हती. जरी माझ्याकडून सर्वकाही घेतलं गेलं तरी मी माझं साम्राज्य पुन्हा उभं करेन असं तो म्हणायचा. तो तितका सक्षम होता आणि तो तितकं करू शकतो इतका ठाम विश्वास मलाही त्याच्यावर होता. जेव्हा लोक सुशांतच्या आर्थिक परिस्थितीबाबत बोलतात तेव्हा मला खूप वाईट वाटतं कारण सुशांत पैशांचा विचार करणारी व्यक्ती नव्हता" सुशांतला कुणी फसवलं असू शकतं का? असं विचारल्या 'लोक असं करू शकतात', असंही अंकिता म्हणाली. हे वाचा - अंकिताची EXCLUSIVE मुलाखत : सुशांत आत्महत्या करूच शकत नाही सुशांतच्या करिअरबाबत बोलताना अंकिताने सांगितलं, "सुशांत जेव्हापासून माझ्यासोबत होता तेव्हापासूनच मी सांगू शकते. संजय सरांनी आम्हा दोघांनीही फिल्मची ऑफर दिली होती. मात्र आम्ही दोघांनीही आमच्या वैयक्तिक कारणाने फिल्मला नकार दिला. नेपोटिझमवरून सुरू असलेल्या वादाचा भाग असेलली एकता कपूर हिनेच सुशांतला पवित्र रिश्तामध्ये लाँच केलं होते. जेव्हा सुशांतला पवित्र रिश्ता सोडायचं होतं तेव्हादेखील ती 'ठिक आहे. तुला आता पुढे जाऊन फिल्ममध्ये काम करायचं आहे तर करू शकतोस', असं म्हणाली होती" "काय पो छे ही सुशांतची पहिली फिल्म अभिषेक कपूर यांनी दिग्दर्शित केली होती. अभिषेक कपूर हे एकताचे भाऊ. त्यामुळे एकताने त्यांना सुशांतची या फिल्ममध्ये निवड करू नये असं सांगू शकली असती. मात्र तिनं तसं केलं नाही. यानंतर एकता सुशांतकडे अनेकदा अनेक फिल्म्स घेऊन गेली मात्र सुशांतने त्या केल्या नाहीत. त्यावेळी मी सुशांतसह होते त्यामुळे मी सांगू शकते आणि स्पष्ट करू शकते", असं अंकिताने सांगितलं. हे वाचा - सुशांतच्या बँक खात्यातून 15 कोटींचा व्यवहार झालाच नाही; CA ने केला मोठा खुलासा मग सुशांतच्या मृत्यूप्रकरणाशी बॉलिवूड नेपोटिझमचा काहीच संबंध नाही का? असं विचारल्यावर अंकिताने सांगितलं, "मला माहिती नाही. सुशांतने अनेक चांगल्या प्रोडक्शन हाऊससह काम केलं आहे. त्यामुळेच तर त्याला इतकं स्टारडम मिळालं. त्याने अनेक चांगले प्रोजेक्ट केले. मात्र ज्या चार वर्षांत मी त्याच्यासह नव्हते त्यावेळी काय झालं असेल याबाबत मी काहीच बोलू शकत नाही" दरम्यान मुंबई आणि बिहार पोलिसांनी या प्रकरणात आपल्याकडून फक्त माहिती घेतली आहे, जबाब नोंदवला नाही, अशी माहितीही अंकिताने दिली.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या