मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /बाळासाठी स्तनपान का महत्वाचं? अभिनेत्रीची मातांसाठी भावनिक पोस्ट

बाळासाठी स्तनपान का महत्वाचं? अभिनेत्रीची मातांसाठी भावनिक पोस्ट

अभिनेत्री अंकिता भार्गव (Ankita Bhargava)हिनंही याबाबत पुढाकार घेतला असून,नुकतीच तिनं स्तनपानाचं महत्त्व सांगणारी तसंच सर्व मातांना आवाहन करणारी एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

अभिनेत्री अंकिता भार्गव (Ankita Bhargava)हिनंही याबाबत पुढाकार घेतला असून,नुकतीच तिनं स्तनपानाचं महत्त्व सांगणारी तसंच सर्व मातांना आवाहन करणारी एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

अभिनेत्री अंकिता भार्गव (Ankita Bhargava)हिनंही याबाबत पुढाकार घेतला असून,नुकतीच तिनं स्तनपानाचं महत्त्व सांगणारी तसंच सर्व मातांना आवाहन करणारी एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

    नवी दिल्ली : नवजात अर्भकांना मातेचं दुध मिळाल्यास त्यांची प्रतिकारशक्ती(Immunity)चांगली होते,त्यामुळं मूल जन्मल्याजन्मल्या त्याला मातेचं पहिलं दूध आवर्जून द्यावं आणि स्तनपान(Breastfeeding)करावं असं वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. स्तनपानाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी सरकारी पातळीवरूनही विविध मोहिमा राबवल्या जातात. टीव्हीवरील अभिनेत्री अंकिता भार्गव (Ankita Bhargava)हिनंही याबाबत पुढाकार घेतला असून,नुकतीच तिनं स्तनपानाचं महत्त्व सांगणारी तसंच सर्व मातांना आवाहन करणारी एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

    अंकिता भार्गव आणि करण पटेल(Karan Patel)ही छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध कलाकार जोडी असून,त्यांना एक मुलगी आहे मेहर. अंकिता भार्गव आणि करण पटेल यांनी 2015 मध्ये विवाह केला होता. त्यानंतर चार वर्षांनी 2019मध्ये त्यांच्या आयुष्यात मेहरचं आगमन झालं. करण आणि अंकिता आपल्या दोन वर्षांच्या गोडुल्या मेहरबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. अंकिता अनेकदा मातृत्वाविषयी(Motherhood)मोकळेपणानं व्यक्त होत असते. सोशल मीडियावर लिखाण करत असते. नुकतीच तिनं स्तनपानाविषयी आवाहन करणारी एक पोस्ट लिहिली आहे. आपली मुलगी मेहर हिच्याबरोबर एक सुंदर फोटो शेअर करत त्या सोबत लिहिलेल्या या पोस्टमध्ये ती म्हणते,या पोस्टद्वारे मी सकारात्मकता निर्माण करण्याचा आणि स्तनपानाविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे.स्तनपान हे फक्त मुलांचे पोट भरण्याकरता आणि त्यांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नाही. हा एक प्रवास आहे,जो तुम्ही तुमच्या बाळासोबत करता. तुम्ही आणि तुमचंच बालरूप तुमच्यासमोर असतं. हा एक संवाद असतो फक्त तुमच्या दोघांमधला;आई आणि बाळामधला. त्याला शब्दांची गरज नसते. बाळ आपल्याला अनेक गोष्टी या वेळी सांगत असतं. मी बरा आहे,मी थकलोय,मी आनंदी आहे,मी एकटा आहे,मी तुला मिस करत आहे,तसंच ते सांगत असतं,आई ! मी तुझ्यावर खूप प्रेम करतो.

    या पोस्टसोबत लिहिलेल्या दुसऱ्या एका पोस्टमध्ये अंकितानं मातांना(Mothers)सल्ला दिला आहे की,आई होणं ही तुमच्या आयुष्यातील अगदी खास गोष्ट आहे. अतिशय सुंदर असा हा क्षण आहे. तो गमावू नका. स्तनपान हा एक आशीर्वाद आहे जो फक्त तुमच्या मुलासाठीच नाही,तर तुमच्यासाठी देखील आहे. यामुळे बाळंतपणानंतर येणाऱ्या डिप्रेशनशीही(Depression)लढण्याची शक्ती मिळते. सर्व मातांना माझं प्रेम आणि पाठिंबा. अंकिताच्या या पोस्टमधून तिच्या महिला चाहत्या नक्कीच काही शिकू शकतील, अर्थात तिचा हा प्रेमाच सल्ला आहे ज्यानी त्यानी त्याच्या पद्धतीने तो स्वीकारायचा.

    First published:
    top videos