S M L

भोजपुरी अभिनेत्री अंजली श्रीवास्तवची आत्महत्या की हत्या?

२९ वर्षीय मॉडेल आणि भोजपुरी अभिनेत्री अंजली श्रीवास्तव हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. अंजली श्रीवास्तवच्या आईने केलेल्या गौप्यस्फोटानंतर या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळालीय

Sachin Salve | Updated On: Jun 20, 2017 09:59 PM IST

भोजपुरी अभिनेत्री अंजली श्रीवास्तवची आत्महत्या की हत्या?

हाजरा बी आणि नीलिमा कुलकर्णी, मुंबई

20 जून : २९ वर्षीय मॉडेल आणि भोजपुरी अभिनेत्री अंजली श्रीवास्तव हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. अंजली श्रीवास्तवच्या आईने केलेल्या गौप्यस्फोटानंतर या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळालीय...पाहूया यावरील स्पेशल रिपोर्ट

मुंबईत अंधेरीतल्या परिमल अपार्टमेंटमध्ये भोजपुरी अभिनेत्री अंजली श्रीवास्तव मृत अवस्थेत आढळली. पंख्याला लटकलेला तिचा मृतदेह ही आत्महत्या असल्याचे सुचवतो. पण या सर्व प्रकरणातील संदिग्धता मात्र वाढत चाललीय. उत्तरप्रदेशातून मुंबईला आलेली अंजलीची आई मात्र हे शक्य नसल्याचं सांगते.अंजलीची आई सांगते, की अंजली आत्महत्या करणं शक्यच नाही. अंजलीची आई शीना श्रीवास्तव यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे ज्या फ्लॅटमध्ये अंजलीचा मृतदेह आढळला त्या फ्लॅटला आतून कडी लावलेली नव्हती. त्यामुळे घडल्या प्रकाराची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी अंजलीच्या आईने केलेय.

याशिवाय अंजलीच्या घराचं छत इतकं मोठंही नाहीए की ज्यामुळे पंख्याला फास लावल्यास तिचा पाय पलंगापर्यंत पोहोचणारही नाही. याशिवाय पोलिसांना अंजलीच्या प्लॅटवर कोणतीही सुसाईड नोट किंवा चिठ्ठी मिळालेली नाही.

अंजलीच्या आईने दिलेली खळबळजनक माहिती

Loading...
Loading...

1. अंजली नैराश्याच्या गर्तेत कधीच नव्हती

2. अंजलीला पैशांची अडचण नव्हती

3. वाढदिवसासाठी अंजलीने केलं होतं शॉपिंग

4. फ्लॅटच्या दाराला आतून कडी नव्हती

5. फोनवर अंजली आनंदात बोलली होती

अंजलीने प्रेमसंबंधांबद्दलही अंजलीच्या आईला काही सांगितलं नव्हतं त्यामुळे अंजलीने आत्महत्या का करेल असा प्रश्न तिची आई विचारते.

एकंदर या सर्व घटनांमुळे भोजपुरी अभिनेत्री अंजली श्रीवास्तवने आत्महत्या केली असावी की ही हत्या असावी असा नवा प्रश्न उद्भवलाय. पोलिसांसाठी मात्र हे एक अजब कोडं होऊन बसलंय हे मात्र नक्की..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 20, 2017 09:59 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close