मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

राधिकाला मॉडर्न लुकमध्ये पाहून चाहतेही आवाक ; पाहा Photos

राधिकाला मॉडर्न लुकमध्ये पाहून चाहतेही आवाक ; पाहा Photos

नेहमी साडीत दिसणारी राधिका काहीसी बदलेली आहे. कारण राधिकाचा  मॉडर्न  लुक सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरला आहे. तिचा हा न्यू लुक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

नेहमी साडीत दिसणारी राधिका काहीसी बदलेली आहे. कारण राधिकाचा मॉडर्न लुक सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरला आहे. तिचा हा न्यू लुक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

नेहमी साडीत दिसणारी राधिका काहीसी बदलेली आहे. कारण राधिकाचा मॉडर्न लुक सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरला आहे. तिचा हा न्यू लुक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 4 ऑक्टोबर ; 'माझ्या नवऱ्याची बायको'   ( Mazhya Navryachi Bayko) या मालिकेतील राधिका म्हणजे अभिनेत्री अनिता दाते ( Anita Date ) या मालिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. मी कुटून राहिले माझ्या नवऱ्याची बायको .. हा डायलॉग म्हणत राधिकाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. एक साधी गृहिणी ते यशस्वी उद्योजिका असा प्रवास या मालिकेत राधिकाने केला. राधिकाचा हाच अंदाज प्रेक्षकांना भावला. आता नेहमी साडीत दिसणारी राधिका काहीसी बदलेली आहे. कारण राधिकाचा  मॉडर्न  लुक सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरला आहे. तिचा हा न्यू लुक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चाहत्यांनी देखील तिच्या या लुकला पसंती दिली आहे.

अनिता दातेने नुकतेच सोशल मीडियावर तिचे काही मॉडर्न लुकमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती जीन्स आणि पांढऱ्या रंगाच्या शर्टमध्ये दिसत आहे. फोटोमध्ये अनिताने सर्व केस मागे बांधले आहे. राधिका या न्यू लुकमध्ये खूप सुंदर दिसत आहे. नेहमी साडीत दिसणारी राधिकाला अशा  मॉडर्न  लुकमध्ये पाहून चाहते देखील खूश झाले आहेत.

वाचा : aryan khan: बॉलीवूडकरांसाठी संकटमोचक ठरणारे सतीश माने शिंदे आहेत तरी कोण?

अनिताच्या या फोटोवर चाहत्यांसोबत कलाकार मंडळींनी देखील कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिजित खांडकेकर, ईशा केसकर, मृण्मयी गोडबोले तसेच नंदिता पाटकर यांना देखील अनिताचा हा न्यू लूक आवडलेला आहे. तिच्या या लूकचे चाहत्यांसोबत कलाकारांनी देखील कौतुक केले आहे.

राधिकाच्या मालिकेने जरी निरोप घेतला असला तरी प्रेक्षकांच्या मनात राधिकाचे स्थान पक्के आहे. आजही प्रेक्षक राधिकाला विसरलेले नाहीत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी संवाद साधत असते. तिचे काही फोटो व व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

अनिताने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात खूप छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत स्पृहा जोशीच्या मैत्रिणीच्या भूमिकेत ती दिसली होती. त्यानंतर ती हलकं फुलकं या नाटकात सागर कारंडेसोबत झळकली होती. एवढेच नव्हे तर राणी मुखर्जीच्या अय्या या चित्रपटात देखील तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती.

First published:

Tags: Marathi entertainment, Tv serial, Zee Marathi, Zee marathi serial