Home /News /entertainment /

Kiran Mane प्रकरणी जातीयवाद आणणाऱ्यांना अनिता दातेने दिलं सडेतोड उत्तर; फेसबुक पोस्ट चर्चेत

Kiran Mane प्रकरणी जातीयवाद आणणाऱ्यांना अनिता दातेने दिलं सडेतोड उत्तर; फेसबुक पोस्ट चर्चेत

Anita Date

Anita Date

माझ्या नवऱ्याची बायको मालिका फेम अभिनेत्री अनिता दाते केळकर (Anita Date) हीने फेसबुक पोस्ट करत किरण मानेंचे समर्थन केले. पण तिला काही नेटकऱ्यांनी ट्रोल केले. त्यानंतर पुन्हा तिने फेसबुक पोस्ट करत ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 17 जानेवारी: मागच्या काही दिवसांपासून किरण माने यांच नाव सगळीकडे चर्चेत आहे. राजकीय भूमिका मांडल्याने 'मुलगी झाली हो' (Mulgi Zali Ho) या मालिकेतील अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांना काढून टाकण्यात आलं असल्याची सगळीकडे जोरदार चर्चा रंगली आहे. किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप देखील केले होते. दरम्यान, माझ्या नवऱ्याची बायको मालिका फेम अभिनेत्री अनिता दाते केळकर (Anita Date) हीने फेसबुक पोस्ट करत किरण मानेंचे समर्थन केले. पण तिला काही नेटकऱ्यांनी ट्रोल केले. त्यानंतर पुन्हा तिने फेसबुक पोस्ट करत ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे. एक दिवसांपूर्वी अनिता दाते यांनी आपल्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. "कोणत्याही अभिनेत्याला/अभिनेत्रीला आगाऊ कल्पना न देता अथवा कोणतीही समज न देता अथवा कोणतेही कारण न देता कामावरून बाजूला करणे चुकीचे आहे. अशा निर्मिती संस्था आणि चॅनलने त्या कलाकाराला कामावरून काढण्याचे योग्य कारण देण्याचे सौजन्य दाखवले पाहिजे. अशा व्यवस्थांचा मी निषेध करते, अशे दाते यांनी म्हटले होते. मात्र, त्यांना त्यांच्या या पोस्टवरुन ट्रोल करण्यात आले. ‘मुलगी झाली हो’ मालिकेतील कलाकारांच्या एका गटाने किरण मानेंवर केले गंभीर आरोप तर दुसऱ्या गटाने केली पाठराखण यानंतर पुन्हा त्यांनी फेसबुक पोस्ट करत किरण मानेंना पाठिंबा देत ट्रोलर्सचा चांगलाच समाचार घेतला आहे. आपले विचार नेहमीच योग्य पध्दतीने आपण मांडले पाहिजे. व्यवस्थेला प्रश्न देखील विचारले पाहिजेत. कोणतीही दडपशाही नसावी असेच मला वाटते. काल पासून माझ्या पोस्ट वरील comment वाचतांना मला अजून काही गोष्टी जाणवल्या . जसे की 1.सभ्यता फार कमी लोकात असते. 2.शिवी देणे चुकीचे आहे असं म्हणणारा माणूस त्याच वाक्यात शिवी देऊ शकतो. 3.अनेक माणसे सभ्य भाषेत धमकी देतात.

  किरण माने प्रकरणाला नवं वळण, अभिनेत्यावर वाहिनीकडून गंभीर आरोप

  4.कोणी ब्राम्हण विरोधी बोलत असेल तर ब्राम्हण स्त्री ने त्याला सपोर्ट करायचा नसतो. त्या साठी टक्याची भाषा वापरतात. 5.काय चूक काय बरोबर हे शोधण्याचा प्रयत्न करण्या पेक्षा आपण आपल्या जाती च्याच बाजूने बोलायला हवं. जात आता आम्ही मानत नाही असं म्हणताना छुप्या पद्धतीने जात मानायची असते .अश्या अनेक गोष्टी ह्या नंतर देखील मला comment मध्ये वाचायला मिळतील. माणूस म्हणून मला समृध्द होण्यासाठी फारच मदत होईल. कलाकाराला त्याला त्याचे काम काढून घेताना ते का काढून घेतले हे विचारतोय तर ते त्याला सांगण्याचे सौजन्य त्या संस्थांनी दाखवले पाहिजे. ही माझी कलाकार म्हणून असलेली अपेक्षा मी मांडली. असे ठामपणे सांगत अनिताने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे.

  यापूर्वी अनिता दातेने काय केली होती पोस्ट?

  "कोणत्याही अभिनेत्याला/अभिनेत्रीला आगाऊ कल्पना न देता अथवा कोणतीही समज न देता अथवा कोणतेही कारण न देता कामावरून बाजूला करणे चुकीचे आहे. अशा निर्मिती संस्था आणि चॅनलने त्या कलाकाराला कामावरून काढण्याचे योग्य कारण देण्याचे सौजन्य दाखवले पाहिजे. अशा व्यवस्थांचा मी निषेध करते, असे दाते यांनी म्हटले आहे. "व्यवस्था समजून घेणे, व्यवस्थेला प्रश्न विचारणे, आपली राजकीय भूमिका योग्य पद्धतीने मांडता येणे ही खरंतर चांगली गोष्ट आहे, असंच मी मानते. त्याबाबत किरण माने यांचे कौतुक आहे. एखाद्या व्यक्तीची पोस्ट समजून घेण्याऐवजी त्याची गळचेपी करणे हे चुकीचे आहे. आपली राजकीय भूमिका वेगळी असेल तर आपण त्या व्यक्तीशी वाद घालू शकतो. चर्चा करू शकतो. मात्र, त्याचं तोंड बंद करणे, त्याला धमकावणे, त्याच्या व्यवसायावर, कामावर टाच आणणे हे समाज म्हणून आपण निर्बुद्ध व मागास असल्याचे लक्षण आहे" असे अनिता दाते  यांनी म्हटले आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment

  पुढील बातम्या