S M L

गुरूच्या नव्या बच्चाबद्दल काय म्हणतेय राधिका?

राधिका म्हणजेच अनिता दाते केळकर हिला नव्या शनायाबद्दल काय वाटतं, हे आम्हाला जाणून घ्यायचं होतं.

Sonali Deshpande | Updated On: Sep 4, 2018 02:59 PM IST

गुरूच्या नव्या बच्चाबद्दल काय म्हणतेय राधिका?

मुंबई, 4 सप्टेंबर : मराठी टीव्ही इंडस्ट्रीत सध्या एकच चर्चा सुरू आहे. ती म्हणजे बदललेली शनाया. 'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये रसिका सुनीलच्या जागी ईशा केसकर आली. तीही एका वेगळ्या थाटात. मालिकेतली राधिका आणि शनाया यांच्यातली केमिस्ट्री काही वेगळीच खुलायची. त्यांच्यातली टशनही लोकांना आवडायची. राधिका म्हणजेच अनिता दाते केळकर हिला नव्या शनायाबद्दल काय वाटतं, हे आम्हाला जाणून घ्यायचं होतं.

'खरं तर रसिकासोबत आम्ही दोन वर्ष काम केलंय. त्यामुळे ती सोडून जाणार हा एक धक्काच होता.' अनिता सांगते. 'पण मालिकांमध्ये असे बदल अनेकदा होतात. ते स्वीकारावे लागतातच.'

नव्या शनायाबद्दल राधिका खूपच खूश आहे. अनिता सांगते, ' रसिकाच्या जागी ईशा येणार हे कळल्यावर छान वाटलं. कारण रसिकाच्या व्यक्तिरेखेतला वेडेपणा या नव्या शनायात म्हणजे ईशामध्ये आहे. त्यामुळे ईशा शनाया चांगलीच साकारते.'

अनिता पुढे सांगते, ' ही शनाया नवा अॅप्रोच घेऊन आलीय. तिच्याकडे नवा अॅटिट्यूड आहे. त्यामुळे काम करताना मजा येतेय.'

नव्या कलाकाराबरोबर काम करायला अनिताला नेहमीच आवडतं. ' रसिका आणि माझं अॅक्शन रिअॅक्शन्स दोन वर्षात ठरलेल्या होत्या. पण आता ईशाबरोबर मी पहिल्यांदा काम करतेय. त्यामुळे भूमिकेतलं गिव्ह अँड टेक नवं असेल. त्याचा चांगला परिणाम मालिकेवरही होतो.'

Loading...
Loading...

एकूणच राधिकानं या नव्या शनायाचं स्वागतच केलंय. आता मालिका जशी पुढे जाईल, तशी त्यांच्यातली केमिस्ट्री जाणवेलच.

ईशा केसकरला शनायाचा अभ्यास करायला फारसा वेळच मिळाला नाही. 29 आॅगस्टलाच निर्णय झाला आणि त्याच दिवशी शूटिंगला सुरुवात झाली. ईशाची शनाया कशी आहे? यावर ईशा सांगते, ' या शनायाचा अॅटिट्यूड बदलतोय. ती फनी, थोडीशी वेडी आहेच. पण आता ती वेगळी वागणारही आहे.'

ईशा म्हणते, ' मला रसिकाच्या शनायाला धक्का लावायचा नाहीय. पण हे एक आव्हान आहे. त्यात प्रयोग करायला मला आवडेल. लोकांचं काय म्हणणं आहे, त्याप्रमाणे मी बदल करेन.'

निक-प्रियांकानंतर आता ‘या’ अभिनेत्रीने केला साखरपुडा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 4, 2018 02:54 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close