Home /News /entertainment /

'वो सात दिन...', 38 वर्ष जुन्या सिनेमाच्या आठवणीत अनिल कपूर भावूक

'वो सात दिन...', 38 वर्ष जुन्या सिनेमाच्या आठवणीत अनिल कपूर भावूक

बॉलिवूडमध्ये आपली 38 वर्ष पुर्ण केली आहेत. अनिल कपूर यांनी चाहत्यांसाठी एक खास पोस्ट शेअर करत आपल्या जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला आहे.

  मुंबई 26 जून: बॉलिवूडचे नायक अनिल कपूर हे एक अष्टपैलू अभिनेते म्हणून ओळखले जातात. आजवर ‘मिस्टर इंडिया’, ‘ताल’, ‘नायक’, ‘शक्ती’, ‘परिंदा’, ‘स्लमडॉग मिलेनियर’ यांसारख्या कित्येक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भुमिका साकारल्या आहेत. अशा या अवलिया अभिनेत्यानं आज बॉलिवूडमध्ये आपली 38 वर्ष पुर्ण केली आहेत. अनिल कपूर यांनी चाहत्यांसाठी एक खास पोस्ट शेअर करत आपल्या जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला आहे. अनिल कपूर यांनी ‘वो सात दिन’ या चित्रपटाद्वारे खऱ्या अर्थानं आपल्या करिअरची सुरुवात केली होती. हा चित्रपट 1983 साली प्रदर्शित झाला होता. खरं तर त्यांनी 1971 साली ‘तू पायल में गीत’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एण्ट्री घेतली होती. त्यानंतर जवळपास 10 वर्ष त्यांनी लहान-लहान भूमिका केल्या. परंतु त्यांना खऱी ओळख मिळाली ती ‘वो सात दिन’ या चित्रपटामुळं. हा त्यांच्या करिअरमधील पहिला सुपरहिट चित्रपट होता. अन् याच चित्रपटाच्या काही जुन्या आठवणी अनिल कपूर यांनी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. सलमानची Fat बहिण कशी झाली Fit? 40 किलो वजन कमी करत दिल्या खास टिप्स
  View this post on Instagram

  A post shared by anilskapoor (@anilskapoor)

  ‘हे काय कपडे घातलेस?’ हटके स्टाईलमुळं अदा शर्मा ट्रोल “वो सात दिन या चित्रपटाला आज 38 वर्ष पुर्ण झाली आहेत. या 38 वर्षांमध्ये मी यशाच्या शिखरावर पोहोचलो. मला विविध प्रकारचे अनुभव घेता आले. परंतु हा दिर्घ प्रवास करणं शक्य झालं कारण तुम्ही कायम माझ्यासोबत होता. असेच सोबत राहा, कारण अजून खूप काही करायचं आहे. नवं शिखर गाठायचं आहे. तुमच्यासाठी मी कायम अशीच मेहनत करत राहीन. धन्यवाद...” अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट करत अनिल कपूर यांनी आपल्या जुन्या आठवणींना नव्यानं उजाळा दिल्या आहेत.
  Published by:Mandar Gurav
  First published:

  Tags: Bollywood actor, Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या