Home /News /entertainment /

OMG! तरुण दिसण्यासाठी सापाचं रक्त पितात अनिल कपूर... पाहा अभिनेत्यानं काय उत्तर दिलं

OMG! तरुण दिसण्यासाठी सापाचं रक्त पितात अनिल कपूर... पाहा अभिनेत्यानं काय उत्तर दिलं

अनिल कपूर अरबाज खानचा शो पिंच 2 मध्ये दिसले होते. या शोमध्ये अरबाज खानने अनिल कपूर यांना अनेक प्रश्न विचारले तर अनिल यांनी त्याची मजेशीर उत्तरंही दिली.

  मुंबई 16 सप्टेंबर : अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) बॉलिवूडचे यंग अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या फिटनेसाठी त्यांना ओळखलं जातं. वयाच्या 64 व्या वर्षीही ते दिवसातून चार चार तास वर्कआउट करतात. काही दिवसांपूर्वीच अनिल कपूर अरबाज खानचा शो 'पिंच 2' (Pinch 2)  मध्ये दिसले होते. या शोमध्ये अरबाज खानने अनिल कपूर यांना अनेक प्रश्न विचारले तर अनिल यांनी त्याची मजेशीर उत्तरंही दिली. या शोमध्ये अरबाज खानने अनिल कपूर यांना काही लोकांचे व्हिडीओज दाखवले. त्या लोकांनी अनिल कपूरच्या लुकवर अनेक कमेंट्स दिल्या होत्या. यात एक व्यक्ती म्हणतो की, अनिल कपूर यांना ब्रम्हा कडून एक वरदान मिळालं आहे. तर एकनो म्हटलं, ‘मला वाटतं की ते प्लास्टीक सर्जनला आपल्या सोबत ठेवतात आणि सापाचं रक्त पितात.
  अरबाज खानने ट्रोलर्सनी अनिल कपूर आणि मुलगी आणि पत्नीवर झालेले ट्रोल्स वाचून दाखवले, पण अनिल कपूर यावर अजिबात चिंतीत झालेले दिसले नाही, तर हुशारिने उत्तरं देताना दिसले. एक कमेंट लिहिली होती की, ‘अनिल कपूर आणि त्यांची मुलगी पैशांसाठी काहीही करू शकतात.’अनिल कपूर यांनी म्हटलं की, ‘त्यांचा दिवस वाईट असेल किंवा काही कारणाने ते दुःखी असतील.’ तर एका कमेंटमध्ये लिहिलं होतं, ‘ज्यांच्याकडे पैसा असतो त्यांना लाज नाही वाटत तर ज्यांना लाज वाटते त्यांच्याकडे पैसा नसतो.’ यावर अनिल कपूर यांनी म्हटलं की, ‘जर तुम्हाला काही माहिती नसेल तर त्यावर मतं व्यक्त करू नयेत.’ तर पुढे एकाने विचारलं होतं, ‘64 व्या वर्षी यंग दिसण्याचं रहस्य काय,’ त्यावर अनिल कपूर म्हणाले ‘प्रेक्षकहो, आम्हाला आमचे खर्च पाहता येतात, आणि जर आम्ही चांगले नाही दिसलो तर आम्हाला कोण पाहणार.’ अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अनिल कपूर यांनी दिली.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Entertainment, Sonam Kapoor

  पुढील बातम्या