मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'दिल धडकने दो' मध्ये अनिल कपूरने प्रियंका चोप्राच्या वडिलांची भूमिकेसाठी दिला होता नकार

'दिल धडकने दो' मध्ये अनिल कपूरने प्रियंका चोप्राच्या वडिलांची भूमिकेसाठी दिला होता नकार

‘दिल धडकने दो’ (Dil Dhadakne Do)या  चित्रपटात अनिल कपूरला (Anil kapoor) अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या (Priyanka chopra) वडिलांची भूमिका (father role) साकारायची नव्हती. कारण तिच्याबरोबर रोमान्स करणारा नायक साकारायची ऑफर त्यांना होती.

पुढे वाचा ...

मुंबई, 22 जानेवारी: झोया अख्तर (Zoya Akhtar) दिग्दर्शित ‘दिल धडकने दो’ (Dil Dhadakne Do)या  चित्रपटात अनिल कपूरने (Anil kapoor) अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या (Priyanka chopra) वडिलांची भूमिका (father role) साकारली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांनीही खूप पसंती दिली होती. पण अनिल कपूरला या चित्रपटात प्रियांका चोप्राच्या वडिलांची भूमिका साकारायची नव्हती, असा खुलासा त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे. अनिल कपूर यावेळी असेही म्हणाले की, या चित्रपटापूर्वी त्यांच्याकडे प्रियांकाच्या नायकाचा रोल त्यांच्याकडे आला होता.

एका वृत माध्यमाशी बोलताना अनिल कपूर म्हणाले की, 'ही पहिली वेळ नव्हती की जिथे मी माझ्या व्यक्तीरेखेशी प्रयोग करत होतो. यापूर्वी मी 'लम्हें' या चित्रपटात देखील एका वयस्कर व्यक्तीची व्यक्तिरेखा साकारली आहे. पण 'दिल धडकने दो' या चित्रपटासाठी मला प्रियांकाच्या वडिलांच्या भूमिकेची ऑफर मिळाली, तेव्हा मला थोडासा संकोच वाटला. कारण या चित्रपटापूर्वी मला प्रियांकासोबत चित्रपटात रोमान्स करण्याची ऑफर मिळाली होती.'

पण त्यानंतर अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धनच्या सांगण्यावरुन त्यांनी हा चित्रपट करण्यास सहमती दर्शविली. हर्षवर्धनने वडिलांना समजावून सांगितलं की, ते खरोखर प्रियांकाचे वडील नाहीत. त्यांना फक्त चित्रपटातलं एक पात्र साकारायचं आहे. या चित्रपटात रणवीर सिंग आणि प्रियांका चोप्रा यांनी अनिल कपूरच्या मुलांची भूमिका केली होती. तर या चित्रपटाचं दिग्दर्शन झोया अख्तर यांनी केलं होतं. अनिल कपूर व्यतिरिक्त शेफाली शाह, अनुष्का शर्मा, फरहान अख्तर यांनीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

अनिल कपूर हे चित्रपट निर्माते राज मेहता यांच्या 'जुग जुग जियो' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अनिल कपूरसोबत मुख्य भुमिकेत वरुण धवन आणि क्यारा अडवाणी काम करणार आहेत. त्याचबरोबर अनिल कपूर अ‍ॅनिमल नावाच्या आणखी एका चित्रपटातही झळकणार आहेत. ज्यामध्ये रणबीर कपूर, बॉबी देओल आणि परिणीती चोप्रा यांच्या महत्त्वाच्या भुमिका असणार आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी अनिल कपूर आणि अनुराग कश्यप यांचा 'एके vs एके' (AK vs AK) हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood News, Priyanka chopra