बायोपिक? छे, छे, माझं आयुष्य तसं कंटाळवाणं - अनिल कपूर

माझ्या आनंदाचं कारण मी माझ्या बायकोबरोबर झालेलं भांडण कधी वाढवत नाही, असं त्यांनी एकदा सांगितलं होतं. म्हणूनच पत्रकार परिषदेत त्यांना त्यांच्यावर बायोपिक आलं तर आवडेल का, असा प्रश्न विचारला होता.

Sonali Deshpande | Updated On: Aug 8, 2018 12:02 PM IST

बायोपिक? छे, छे, माझं आयुष्य तसं कंटाळवाणं - अनिल कपूर

मुंबई, 08 आॅगस्ट : अनिल कपूर म्हणजे नुसता उत्साह. कुठल्याही तरुणाला लाजवेल अशी उर्जा. अनिल कपूरचं खरं वय तर कधी कुणी विचारतच नाही. एका मुलीचे हे वडील आहेत, सासरे आहेत हेही त्यांच्याकडे पाहून वाटत नाही.  अनिल कपूर नेहमीच आनंदी असतात. माझ्या आनंदाचं कारण मी माझ्या बायकोबरोबर झालेलं भांडण कधी वाढवत नाही, असं त्यांनी एकदा सांगितलं होतं. म्हणूनच पत्रकार परिषदेत त्यांना त्यांच्यावर बायोपिक आलं तर आवडेल का, असा प्रश्न विचारला होता.

त्यावर त्यानं उत्तर दिलं होतं, मी कोणत्याच वादात कधी पडलो नाही आणि पडणारही नाही, त्यामुळे माझ्यावरील बायोपिक पहायला कुणाला आवडणार नाही.' गेली अनेक दशकं लोकप्रियतेच्या शिखरावर असणारा हा अवलिया बायोपिकबद्दल प्रश्न विचारताच मात्र नेहमीच्याच मिश्किल अंदाजात असं म्हणाला. सध्या बायोपिकची लाट सुरू आहे पण माझ्यावरील बायोपिक बोअरिंग असेल त्यामुळे तो बायोपिक न केलेलाच बरा असंही ते सांगायला विसरले नाहीत.

अनिल कपूर आणि सोनम कपूर एक लडकी को देखा नावाचा सिनेमा एकत्र करतायत.या सिनेमाच्या शूटिंगला सोनमने आता सुरुवात देखील केली आहे. सोनमने सोशल मीडियावर वडिलांसोबत फोटो शेअर करत मी या सिनेमासाठी फारच उत्सुक असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर वडिलांच्या टीमसोबत काम करत असताना मला घराच्यासारखं वाटतं आहे. असंही सोनम म्हणाली.

या सिनेमात सोनम कपूर आणि अनिल कपूरसोबतच राजकुमार राव, जूही चावलाही झळकणार आहे. बाप आणि मुलीच्या नात्यावर हा सिनेमा बनवण्यात येणार आहे. त्यामुळे बाप-बेटीचं खरं नात सिनेमातून चाहत्यांना अनुभवता  येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 8, 2018 11:46 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close