अनिकेत विश्वासराव म्हणतोय, हृदयात वाजे समथिंग

अनिकेत विश्वासराव म्हणतोय, हृदयात वाजे समथिंग

अनिकेत विश्वासराव आणि स्नेहा यांचा साखरपुडा तर झाला. आता सगळ्यांना प्रतिक्षा आहे ती त्यांच्या लग्नाच्या तारखेची. पण आता त्या दोघांचा एकत्र असलेल्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय.

  • Share this:

मुंबई, 10 सप्टेंबर : अनिकेत विश्वासराव आणि स्नेहा यांचा साखरपुडा तर झाला. आता सगळ्यांना प्रतिक्षा आहे ती त्यांच्या लग्नाच्या तारखेची. पण आता त्या दोघांचा एकत्र असलेल्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. 'हृदयात वाजे समथिंग' सिनेमाचा ट्रेलर बाहेर आलाय. त्यात या दोघांबरोबर महत्त्वाची भूमिका आहे अशोक सराफ यांची.

सिनेमाचे दिग्दर्शक आहेत प्रवीण कारळे. त्यांचं अशोकमामांबरोबर काम करण्याचं स्वप्न होतं. ते पूर्ण झालं. ते सांगतात, '  प्रेमात पडल्यानंतरच्या धमाल गंमती-जंमतीना अशोकमामांच्या कॉमिक टाइमिंगमुळे रंगायला खूप मदत झाली आणि सिनेमा खूप मनोरंजक झाला आहे. '

अशोक सराफही सिनेमावर खूश आहेत. ते म्हणाले, 'चांगली कथा, उत्तम दिग्दर्शन आणि कसलेले कलाकार यामुळे कोणत्याही धाटणीचा सिनेमा मनोरंजक होतो. प्रेमात पडलेल्या प्रत्येकाला हा सिनेमा आपल्या हृदयाजवळचा वाटेल, असा मला विश्वास आहे.'

स्नेहा-अनिकेतचा साखरपुडा झालाय. स्नेहानं सांगितलं, 'हे काही आमचं लव्ह मॅरेज नाही, तर अॅरेंज मॅरेज आहे. जूनमध्ये हे लग्न ठरलं. स्नेहाची आई आणि अनिकेतची मावशी एकाच सोसायटीत राहतात.'

स्नेहासाठी जसा मुलगा बघत होते, तशी अनिकेतसाठी मुलगी बघत होतेच. मग एकमेकांच्या स्थळाचा विचार झाला. तोपर्यंत स्नेहा आणि अनिकेत फक्त सहकलाकार होते. नंतर दोघांकडून पसंती आली. आणि साखरपुडा झाला.

ताज्या बातम्या