अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि माधव देवचक्के फ्राॅडच्या जाळ्यात, फेसबुकवर मांडली व्यथा

अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि माधव देवचक्के फ्राॅडच्या जाळ्यात, फेसबुकवर मांडली व्यथा

या फ्रॉडच्या नवनवीन पद्धतींना बळी पडणाऱ्यांमध्ये सेलिब्रिटी अपवाद ठरलेले नाहीत. अनिकेत विश्वासराव आणि माधव देवचक्के या दोन मराठी अभिनेत्यांसोबत असंच काहीसं झालं

  • Share this:

चित्राली चोगले, 30 मार्च : आपण सध्या इतके आधुनिक झालो आहोत की सध्याचे फ्रॉडही आधुनिक पद्धतीचे घडताना दिसतायेत. आणि या फ्रॉडच्या नवनवीन पद्धतींना बळी पडणाऱ्यांमध्ये सेलिब्रिटी अपवाद ठरलेले नाहीत. अनिकेत विश्वासराव आणि माधव देवचक्के या दोन मराठी अभिनेत्यांसोबत असंच काहीसं झालं आणि त्यांनी थेट फेसबुकवरून त्यांची व्यथा मांडली.

फेसबुकवरून आपला डेटा चोरीला जायची भीती आहे. पण या फेसबुकचे फायदेही अनेक आहेत आणि त्यातलाच एक म्हणजे बऱ्याच लोकांपर्यंत एकाच वेळी पोहचता येणं. याचाच उपयोग करून घेतला मराठीतल्या दोन अभिनेत्यांनी. दोघांसोबत झालेल्या फ्रॉडची व्यथा त्यांनी या फेसबुकद्वारे त्यांच्या फॅन्ससोबत फक्त मांडली नाही तर त्यांना जागरुकही केलं. अनिकेत विश्वासराव आणि माधव देवचक्के यांनी फेसबुकवर लाईव्ह येऊन त्यांच्या व्यथा मांडल्याआहेत.

अनिकेतला जिथे दोन माणसांनी एनजीओच्या नावाखाली फसवलं आणि लाखांचा गंडा घातला आता ते फरार आहेत. तिथेच माधव हा कार्ड क्लोनिंगचा बळी ठरलाय.जिथे अनिकेतच्या प्रसंगावरून आपण एनजीओ किंवा सामाजिक कार्य करताना सतर्क राहण्याची खबरदारी घेतली पाहिजे.  तिथेच माधवच्या प्रसंगातून आपलं डेबिट कार्ड वापरताना ते कोणाच्या हातात देऊ नये किंवा एटीएम वापरताना कार्ड मशीनमध्ये आत जातं तिथे एखादी वेगळी मशीन तर लावली गेली नाहीये ना याची पडताळणी करून घेणं गरजेचं आहे, हे समजतं.

या दोन कलाकारांसोबत झालेला प्रकार खूपच वाईट आहे पण त्यांनी इतरांना जागरुक करण्याची सतर्कता दाखवणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. आपणही  यातून धडा घेतला पाहिजे.

First published: March 30, 2018, 4:41 PM IST

ताज्या बातम्या