ब्रॅड पिटसोबत घटस्फोट, तीन वर्षांनंतर एंजेलिना जोलीनं सांगितलं कारण

'एंटरटेनमेंट टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत एंजेलिनानं त्यांचं नात तुटण्यामागचं कारण सांगितलं.

  • Share this:

हॉलिवूड अभिनेत्री एंजेलिना जोलीनं पती ब्रॅड पिटसोबत घेतलेल्या घटस्फोटावर पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'एंटरटेनमेंट टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत एंजेलिनानं त्यांचं नात तुटण्यामागचं कारण सांगितलं.

एंजेलिना आणि ब्रॅड जवळपास 2005 पासून एकत्र होते. 'मिस्टर अँड मिसेस स्मिथ' आणि 'बाय द सी' या चित्रपटात ते एकत्र दिसले. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांनी भावली. त्यांच्या नात्याची चर्चा हॉलिवूडमध्ये बराच काळ चालली.

अखेर नऊ वर्षांनंतर 2014 रोजी ब्रॅड एंजेलिना विवाहबंधनात अडकले. पण त्यांचं हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही. त्यांनी लग्नानंतर अवघ्या दोन वर्षातच वेगळं होण्याचा निर्णय घेतला. ब्रॅड आणि एंजेलिनाला एकूण सहा मुलं आहेत.

घटस्फोटानंतर अनेकदा त्यांना यामागचं कारण विचारण्यात आलं मात्र त्यांनी नेहमीच यावर प्रतिक्रिया देणं टाळलं. पण आता एंजेलिनानं यामागचं खरं कारण स्पष्ट केलं.

'एंटरटेनमेंट टुडे'शी बोलताना एंजेलिना म्हणाली, 'ब्रॅडला लागलेलं दारूचं व्यसन आणि माझ्या यशाबद्दल वाटत असलेली ईर्षा या कारणाने मी त्याच्याशी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.' त्याला याच कारणाने हॉलिवूडमधील चांगल्या संधी गमवाव्या लागल्याचंही एंजेलिनानं सांगितलं.

काही दिवसांपूर्वी ब्रॅडनं मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत एंजेलिना माझा कोणताच निर्णय विचारात घेत नसल्याचं एका मुलाखतीत सांगितलं होतं. मला माझ्या मुलांसाठी काहीतरी करायचं आहे. पण एंजेलिनाचं असं वागणं माझ्यासाठी त्रासदायक आहे. असंही तो म्हणाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 13, 2019 11:40 AM IST

ताज्या बातम्या