नेहाच्या शोमध्ये अंगदचा कबुलीजबाब, लग्नाआधी होती 75 अफेअर्स

नेहाच्या शोमध्ये अंगदचा कबुलीजबाब, लग्नाआधी होती 75 अफेअर्स

नेहाचा एक शो सुरू आहे, फिल्टर नेहा. या शोमध्ये अनेक सेलिब्रिटीज येऊन आपली सीक्रेट्स शेअर करतात.

  • Share this:

मुंबई, 16 नोव्हेंबर : अंगद बेदी आणि नेहा धुपिया यांची जोडी लग्नानंतरही चर्चेत आहे. नेहाचा एक शो सुरू आहे, फिल्टर नेहा. या शोमध्ये अनेक सेलिब्रिटीज येऊन आपली सीक्रेट्स शेअर करतात. या शोमध्ये कोण आलं होतं ठाऊकेय? चक्क अंगद बेदी. नेहाचा नवरा.


अंगदला नेहानं विचारलं, लग्नाआधी तुला किती गर्लफ्रेंड्स होत्या? यावर अंगद म्हणाला, माझा जास्त स्त्रियांशी संबंध आला नाही. पण 75 स्त्रियांशी माझा संबंध होता.'


पुढे तो म्हणाला, ' मी अगोदर खूप लाजाळू होतो. पण मी दिल्लीला आल्यानंतर सर्व गोष्टी बदलल्या. मलाच माझं वेगळं रूप पाहायला मिळालं.'


याच शोमध्ये अंगदनं हे मान्य केलं की लग्नाआधी नेहा गरोदर होती. ही गोष्ट जेव्हा त्यानं नेहाच्या आईवडिलांना सांगितली, तेव्हा सुरुवातीला ते एकदम शांत झाले. पण नंतर ते नाराजही झाले.


नेहा गरोदर झाल्यानंच त्यांनी घाईनं लग्न केलं, हा अंदाज होताच. नेहा आणि अंगद एकमेकांच्या प्रेमात आहेत, हे लक्षात आलं सिनेमांच्या वेळी. तुम्हारी सुलू रिलीज झाल्यानंतर अंगदनं सोशल मीडियावर नेहाचं कौतुक केलं होतं.


नेहानंही टायगर जिंदा है सिनेमाच्या वेळी अंगदचं अभिनयाचं कौतुक केलं होतं. मग एक दिवस बातमी आली, दोघांनी गुरुद्वारात जाऊन लग्न केलं.


अंगद नेहाच्या प्रेमात पडला होता. पण नेहा त्याच्यात अजिबात रस घेत नव्हती. एका मुलाखतीत अंगद म्हणाला होता, ' मी अण्डर 19 क्रिकेट खेळत होतो, तेव्हाच नेहाच्या प्रेमात पडलो होतो. ती जिममध्ये यायची. पण मला तिचं नाव माहीत नव्हतं.'


मग हळूहळू दोघांची ओळख, नंतर मैत्री आणि मग प्रेम अशा गोष्टी घडत गेल्या. सुरुवातीला अंगदला नकार देणारी नेहा आज त्याच्या प्रेमात आकंठ बुडालीय.


Photos: दीपिकाच्या स्वागताला सजलं रणवीरचं घर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 16, 2018 10:39 AM IST

ताज्या बातम्या