सलमान पुन्हा साकारणार 'प्रेम'ची भूमिका ?

सलमान पुन्हा साकारणार 'प्रेम'ची भूमिका ?

प्रेम हा पुन्हा एकदा मोट्या पडद्यावर आपली जादू दाखवायला येणार आहे.

  • Share this:

मुंबई, २4 जुलै : प्रेम हा पुन्हा एकदा मोट्या पडद्यावर आपली जादू दाखवायला येणार आहे. काही कळलं का ? नसेल तर थांबा आणि हे वाचा.....आम्ही सालमान खान बदल बोलत आहे. त्याचा नवीन चित्रपट येतोय ज्यामध्ये त्याचे नाव प्रेम आहे. सलमान खानने बऱ्याचशा चित्रपटात प्रेमची भूमिका साकारली आहे. आता त्याचा अजून एक चित्रपट येतोय ज्यामध्ये पुन्हा तो प्रेमची भूमिका साकारणार आहे. सलमान 'मैने प्यार किया'चा सिक्वल काढत नाहीय तर त्याचा 2011 मध्ये आलेला 'रेड्डी' चित्रपटाचा सिक्वल येत आहे.

सलमान खान सध्या त्याचा येणार चित्रपट 'भारत'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पण त्याच्या फॅन्स साठी एक आनंदाची बातमी आहे. दबंगचा सिक्वल काढल्यानंतर आता त्याचा अजून एका चित्रपटाचा सिक्वल येणार आहे. 2011 मध्ये आलेला त्याच्या 'रेड्डी' या चित्रपटाचा सिक्वल येत आहे. या सिक्वल मध्ये तो प्रेमची भूमिका साकारणारा आहे. प्रोड्युसर भूषण कुमार आणि डायरेक्टर अनीस बज्मी या चित्रपटाच्या सिक्वलसाठी सलमानशी बोलत आहेत.

मराठा मोर्चाकडून 'ही' शहरं वगळता आज महाराष्ट्र बंदची हाक

मुंबई मिररच्या एका रिपोर्टरच्या मते भूषण कुमारनं म्हंटलं आहे की, 'अतुल अग्निहोत्री सोबत माझ्या प्रोडक्शन कंपनीमध्ये 'भारत' या चित्रपटाचे शूटिंग सुरु केलं. आता आमचं सलमान भाई आणि अनिस भाई सोबत 'रेडी 2' साठी बोलणं सुरु आहे. यासाठी फक्त आता स्क्रिप्टची कमतरता आहे'.

रेडी 2 बद्दल अनीस बज्मी म्हणतात की, मी या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी जास्त वेळ नाही थांबू शकता. गेल्या काही महिन्यांपासून भूषण कुमार आणि माझ्यात या चित्रपटाबद्दल बोलणं सुरु आहे. ते सुद्धा रेडी 2 बनवण्यासाठी खूप उत्सुक आहेत. काही भेटींमध्ये गोष्टी सकारात्मक होताना दिसतायत. पण तारखांबाबतीत आणि इतर गोष्टींबाबतीत सलमानशी अद्याप बोलणं झालेलं नसल्याचं सागंण्यात आलं आहे.

हेही वाचा...

शूटआऊट अॅट नालासोपारा, भरस्त्यावर गुंडाचा एन्काऊंटर

बापरे!,आॅनलाईन केली सापाची आॅर्डर, बाॅक्स उघडला अन्...

मुख्यमंत्री फडणवीसांनी 'या' गुन्ह्यातून बिल्डरांची केली सुटका

First published: July 24, 2018, 7:48 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading