‘बेडरुम सीन्स करुन थकलेय, फी कमी द्या पण...’ वैतागलेल्या अभिनेत्रीनं व्यक्त केली खंत

‘बेडरुम सीन्स करुन थकलेय, फी कमी द्या पण...’ वैतागलेल्या अभिनेत्रीनं व्यक्त केली खंत

सतत इंटिमेट सीन्सच्या ऑफर येत असल्यानं कंटाळलेल्या या अभिनेत्रीनं नुकत्याच एका मुलाखतीत आपली खंत व्यक्त केली.

  • Share this:

मुंबई, 29 फेब्रुवारी : सिनेसृष्टीत काम करताना नव्या कलाकारांना बरीच मेहनत घ्यावी लागते. त्याहून जास्त मेहनत घ्यावी लागते ती इथं टिकून राहण्यासाठी. पण अनेकदा इथं टिकून राहण्याच्या नादात काही कलाकारांना एकाच प्रकरच्या भूमिका वाटणीला येतात आणि मग तिच त्यांची ओळख होऊन जाते. असंच काहीस झालंय साउथच्या एका अभिनेत्रीसोबत. साउथ अभिनेत्री अँड्रिया जेरेमिया एकसारख्या भूमिका साकारुन एवढी कंटाळली आहे की तिनं आता याबद्दल खंत व्यक्त केली आहे.

अँड्रिया मागच्या काही वर्षांपासून साउथ सिने इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. अनेक बिग बजेट सिनेमातही तिनं काम केलं आहे. मात्र आता सतत एकाच प्रकारच्या भूमिका ऑफर होऊ लागल्यानं ती खूप वैतागली आहे. सतत इंटिमेट सीन्सच्या ऑफर येत असल्यानं कंटाळलेल्या अँड्रियानं मला आता असे सीन्स करायचे नाहीत. आता काही वेगळ्या भूमिका साकारायची इच्छा असल्याचं म्हणत भले फी कमी द्या पण वेगळं काम द्या अशा शब्दात तिनं आपली खंत व्यक्त केली आहे.

फोटोग्राफरच्या पायावरुन गेली वरुण धवनची कार, पाहा अभिनेत्यानं काय केलं

 

View this post on Instagram

 

Whatcha lookin at 😛 📸@soondah_wamu MUH @prakatwork

A post shared by Andrea Jeremiah (@therealandreajeremiah) on

अँड्रिया साउथ इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. गौतम वासुदेव मेनन यांच्या ‘पचाईकिली मतुचरम’ या सिनेमातून तिनं तिच्या करिअरची सुरुवात केली होती. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या वेती रामन यांच्या वादा चेन्नई या सिनेमात तिचे काही इंटिमेट सीन्स आहेत. त्यानंतर तिला अशाच प्रकारच्या भूमिका ऑफर होत आहेत. अशात फिल्म बीटला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिनं तिचं दुःख व्यक्त केलं आहे. ती म्हणाली, आता या एकाच प्रकारच्या भूमिका साकारुन मला कंटाळा आला आहे. मला आता एखादी चांगली भूमिका ऑफर झाली आणि त्यासाठी कमी मानधन दिलं तरीही मी काम करायला तयार आहे.

Bigg Boss 13 फेम पारस-माहिरा अडकले लग्नाच्या बेडीत? काय आहे Viral Photos चं सत्य

अँड्रिया सध्या तिचा आगामी सिनेमा ‘मास्टर’च्या शूटिंगमध्ये बीझी आहे. या सिनेमात ती साउथ सुपरस्टार तालापति विजय आणि मालविका मोहन यांच्यासोबत दिसणार आहे.

पार्टी करून परतत होती जान्हवी; फोटोग्राफर म्हणाला, ‘आप कहो तो घर तक भी आएंगे’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Bollywood
First Published: Feb 29, 2020 02:21 PM IST

ताज्या बातम्या