अंध आयुषमान खुरानाला वेगळं काही दिसतंय!

अंध आयुषमान खुरानाला वेगळं काही दिसतंय!

एक अंध पियानो वादक. आपल्या अप्रतिम वादनानं सगळ्यांनाच खूश करून जातो. पण हाच अंध पियानो वादक एका खुनाचा साक्षीदार बनतो.

  • Share this:

मुंबई, 2 सप्टेंबर : एक अंध पियानो वादक. आपल्या अप्रतिम वादनानं सगळ्यांनाच खूश करून जातो. पण हाच अंध पियानो वादक एका खुनाचा साक्षीदार बनतो. आयुषमान खुरामाच्या 'अंधाधुंद' सिनेमाचं ट्रेलर रिलीज झालंय. त्याच्यासोबत राधिका आपटे, तब्बूही आहेत. हा सिनेमा एक रहस्यपट आहे.

अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत पुन्हा येतायत एकत्र

PHOTOS : बिग बींच्या लेकीनं उघडलं फॅशन स्टोअर, कोणी कोणी लावली हजेरी?

VIDEO : ही पहा दहिहंडीची सुपर हिट गाणी

आयुषमाननं हे ट्रेलर ट्विट केलंय. त्यात त्यानं म्हटलंय, मी जे बघू शकतो, ते तुम्ही नाही बघू शकत.

श्रीराम राघवन यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केलाय. बदलापूर सिनेमानंतर पुन्हा एकदा ते हा सिनेमा घेऊन येतायत. आयुषमाननं यात अंध पियानोवादकाची भूमिका साकारलीय.

आयुषमानचा शुभमंगल सावधान, मेरी प्यारी बिंदू, दम लगा के हैशा असे अनेक सिनेमे गाजले. अंधाधुंद सिनेमात त्याची हटके भूमिका आहे.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर 'टू मच ऑफ राधिका आपटे' नावाने अभिनेत्री राधिका आपटेला ट्रोल करण्यात आलं. नेटफ्लिक्सवरील सेक्रेड गेम्सनंतर 'घोल" या मिनी सीरीजमध्ये प्रमुख भूमिकेत दिसतेय. ही सिरीज हॉरर क्लासिक प्रकारात मोडते. राधिका आपटे नेहमीच तिच्यावर कोणतेही आरोप करण्यात आले तर त्याला प्रत्युत्तर देण्यात पटाईत आहे.

याही वेळी राधिका आपटेने एक व्हिडिओ रॅडफ्लिक्ससाठी शूट केलाय. ज्यात ती या ट्रोल करणाऱ्यांचे आभार मानतेय. 'घोल'ची ऑफर जेव्हा आली तेव्हा प्रथम तिने ती नाकारली पण यात अनेक भूमिका करण्याचं आव्हान असल्यामुळे आणि निर्मात्यांनी राधिकाच्याच नावाचा हट्ट धरल्यामुळे अखेर तिने ती स्वीकारली असं राधिका सांगतेय.

घोलमध्ये राधिकाच्या बऱ्याच भूमिका आहेत. अगदी गावातली एक साधी बाई ते काॅर्पोरेट आॅफिसमध्ये काम करणारी तरुणी, सामाजिक कार्यकर्ती अशा भूमिका तिनं साकारल्यात.

First published: September 2, 2018, 5:16 PM IST

ताज्या बातम्या