Home /News /entertainment /

एका सिनेमामुळे अनन्या होईल देशातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, निर्मातीनं केला दावा

एका सिनेमामुळे अनन्या होईल देशातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, निर्मातीनं केला दावा

बॉलिवूडमध्ये 'स्टुडंट ऑफ द इयर 2' आणि 'पती पत्नी और वो' हे सिनेमे केल्यानंतर अनन्या पांडे 'फायटर' या सिनेमातून दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.

  मुंबई, 21 मे : सध्या बॉलिवूडमध्ये स्टार किड्सची चलती आहे. मागच्या वर्षभरात सारा अली खान, जान्हवी कपूर इशान खट्टर अशा अनेक स्टार किड्सनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यापैकीच एक म्हणजे अनन्या पांडे. अभिनेता चंकी पांडे मुलगी अनन्या बॉलवूडमध्ये पदार्पण करण्याआधीपासूनच तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत होती. पण आता पुन्हा चर्चेत आली आहे ती तिच्या आगामी सिनेमाच्या निर्मातीनं केलेल्या वक्तव्यामुळे. हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर अनन्या देशातली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री होईल असा दावा या सिनेमाच्या निर्मातीनं केला आहे. अनन्याच्या अभिनयावरुन अनेकदा तिची खिल्ली उडवली जाते. पदार्पणातच तिला फिल्म फेअर पुरस्कार मिळाल्यानंतर अनेकांनी या पुरस्कारावर प्रश्न उपस्थित केले होते. परंतु ‘फायटर’ हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर तिला ट्रोल करणाऱ्यांची बोलती बंद होईल असा दावा या सिनेमाची निर्माती चार्मी कौर हिने केला आहे. 'फायटर' सिनेमा रिलीज झाल्यानंतर अनन्याला भारतातल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत स्थान मिळेल असंही ती म्हणाली.
  View this post on Instagram

  i spend 500% of my life exaggerating ‍♀️

  A post shared by Ananya (@ananyapanday) on

  बॉलिवूडमध्ये 'स्टुडंट ऑफ द इयर 2' आणि 'पती पत्नी और वो' हे सिनेमे केल्यानंतर अनन्या पांडे 'फायटर' या सिनेमातून दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटाची निर्माती चार्मी कौर हिने 'बॉलिवूड लाइफ'ला दिलेल्या मुलाखतीत अनन्याच्या अभिनयाची खूप स्तुती केली. “अनन्या एक उत्तम अभिनेत्री आहे. तिला केवळ चांगल्या पटकथांची गरज आहे. ‘फायटर’ हा सिनेमा रिलीज होताच ती भारतातील सर्वोत्कृष्ट पहिल्या तीन अभिनेत्रींच्या यादीत असेल याची मला खात्री आहे." असा दावा चार्मीने केला.
  चार्मी कौर ही एक प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. सध्या ‘फायटर’ या चित्रपटाची निर्माती म्हणून ती काम करत आहे. या सिनेमात अभिनेता विजय देवरकोंडा मुख्य भूमिकेत आहे. तर अनन्या त्याच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारत आहे. या सिनेमाच्या काही भागांचं शूटिंग मुंबईमध्ये झालं असून त्यावेळी अनन्या आणि विजयचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood

  पुढील बातम्या