Elec-widget

फोटोशूटच्या आधी अनन्या पांडेचा फाटलेला ड्रेस असा शिवत होता असिस्टंट, VIDEO व्हायरल

फोटोशूटच्या आधी अनन्या पांडेचा फाटलेला ड्रेस असा शिवत होता असिस्टंट, VIDEO व्हायरल

अनन्‍या पांडे (Ananya Pandey) ही आपल्या आगामी चित्रपट'पति पत्‍नी और वो' (Pati Patni Aur Woh) च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

  • Share this:

03 डिसेंबर : अनन्‍या पांडे (Ananya Pandey) ही आपल्या आगामी चित्रपट'पति पत्‍नी और वो' (Pati Patni Aur Woh) च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच ती प्रत्येक रिअॅलिटी शोमध्ये पाहण्यास मिळत आहे. तिच्यासोबत सहकलाकार कार्तिक आर्यन (Kartik Aryan) आणि भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) ही प्रमोशन करताना हजर असतात.

प्रमोशन दरम्यान अनन्या इतकी व्यस्त असते की तिचा ड्रेस फाटला हे तिला लक्षात सुद्धा आलं नाही. एवढंच नाहीतर ड्रेस शिवण्यासाठी तिच्याकडे अजिबात वेळ सुद्धा नव्हता. तेव्हा टीममधील एक सदस्य अनन्या ही कपडे परिधान करून तशीच उभी होती आणि तो ड्रेस शिवत होता.

 

Loading...

View this post on Instagram

 

all that glitters isn’t gold!!!! A1 team ❤️ #PatiPatniAurWoh promotions BTS just 5 days to gooooo

A post shared by Ananya (@ananyapanday) on

हा व्हिडिओ अनन्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये टीमचा एक सदस्य हा अनन्याचा फाटलेला ड्रेस शिवत आहे. अनन्या उभं राहूनच जेवण करत आहे. या व्हिडिओच्या पोस्टमध्ये ती म्हणते की, 'सर्व ग्‍लिटर गोल्‍ड नसतात. ए1 टीम, पती पत्‍नी वो प्रमोशन बिहाइंड द सीन.'

अनन्या ही गेल्या 15 तासांपासून वेगवेगळ्या ठिकाणी प्रमोशन करत आहे. तिचं एका ठिकाणी फोटोशूट होतं आणि फक्त 15 मिनिटाचा अवधी होता. त्यामुळे यावेळी तिला कपडे बदलले पासून ते मेकअॅप करण्यासाठी वेळ नव्हता. त्यामुळे तीने हे पाऊल उचललं.

माहितीसाठी 'पति पत्‍नी और वो' अनन्‍याचा हा दुसरा सिनेमा आहे. याआधी 'स्‍टूडेंट ऑफ द ईयर 2' या चित्रपटातून तिने आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 3, 2019 09:32 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com