मुंबई, 13 मार्च: बॉलीवूड अभिनेता चंकी पांडेची मुलगी आणि अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) तिच्या ग्लॅमरस लुकमुळे (Glamorous Look) चाहत्यांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे. बॉलिवूडमधील इतर अभिनेत्र्यांप्रमाणेच अनन्याही तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे (Dressing Sense) अनेकदा चर्चेत असते. बरेच चाहते अनेकदा अनन्याच्या ड्रेसिंग सेन्सचं अनुकरण करतात. अनन्या पांडे सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असून ती चाहत्यांसाठी अनेक सुंदर शेअर करत असते. कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे अनन्या नेहमी चर्चेच येते.
अनन्या कधी चित्रपटामुळे तर कधी तिच्या फोटोंमुळे चर्चेत येते. अनन्या पांडेने आतापर्यंत तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून अनेक फोटो शेअर केले आहेत, जे प्रचंड व्हायरल झाले आहेत. पण अनन्याने अलीकडेच काही नवीन फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे तिला नेटकरी ट्रोल करीत आहेत. तिच्या कपड्यावरुन नेटकऱ्यांनी तिला डिवचलं आहे. अनन्या नुकतीच अरबाज खानचा चॅट शो 'पिंच' च्या शूटींगसाठी आली होती. यावेळी तिने निळ्या पांढऱ्या रंगाचे पट्टे असलेला ड्रेस परिधान केला होता. यामुळेच तिला ट्रोल केलं जात आहे.
फुल स्लीव्ह क्रॉप टॉप आणि शॉर्ट स्कर्ट घालून आलेल्या अनन्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नेटकऱ्यांच्या मते, या कपड्यांमध्ये अनन्या पांडे एखाद्या चीअर लीडरप्रमाणे दिसत होती. यावेळी अनन्याने अनेक फोटोही काढले. तिचे हे फोटो आता सोशल मीडियात व्हायरल होताना दिसत आहेत. तर या फोटोंवर संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. अनन्या पांडेच्या या लुकचं अनेकांनी कौतुक देखील केलं आहे.
हे ही वाचा -‘का बिचारीला बदनाम करताय?’ ब्रिटनच्या राणीला ट्रोल करणाऱ्यांवर कंगना संतापली
अनन्या पांडेनं 'स्टुडंट ऑफ द इयर 2' या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर अनन्याने आपल्या मेहनतीच्या आणि सौंदर्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपलं एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. अनन्या पांडे सध्या 'लायगर' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती दक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडासोबत पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. या जोडीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता दाटली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.