बॉलिवूडमध्ये येण्याआधी अनन्या पांडे करायची 'हे' उद्योग, शाहरुखच्या मुलीचीही होती साथ

बॉलिवूडमध्ये येण्याआधी अनन्या पांडे करायची 'हे' उद्योग, शाहरुखच्या मुलीचीही होती साथ

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि संजय कपूरची मुलगी शनाया कपूर यांच्याशी अनन्याची असलेली बालपणापासूनची मैत्री सोशल मीडियावर खूप चर्चेत राहिली.

  • Share this:

मुंबई, 10 मे : अनन्या पांडे सध्या तिचा सिनेमा 'स्टुडंट ऑफ द इयर 2'मुळे खूपच चर्चेत आहे. यासिनेमातून अनन्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. मात्र बॉलिवूडमध्ये येण्याआधीही अनन्या तिच्या सोशल मीडिया पोस्ट आणि हटके फॅशन सेन्समुळे चर्चेत होती. याशिवाय एका गोष्टीची सोशल मीडियावर जास्त चर्चा झाली ती म्हणजे शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि संजय कपूरची मुलगी शनाया कपूर यांच्याशी अनन्याची असलेली बालपणापासूनची मैत्री. अनन्यानंतर या दोघीही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं बोललं जात आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनन्यानं सुहाना आणि शनायासोबतच्या मैत्रीचे काही किस्से शेअर केले.
 

View this post on Instagram
 

Happy birthday Sue, we love you ❤️


A post shared by Ananya 👩🏻‍🎓💫 (@ananyapanday) on

सुहाना आणि शनायासोबतच्या अनेक गमतीदार आठवणी अनन्या यावेळी शेअर केल्या. ती म्हणाली, 'मी, शनाया आणि सुहाना आमचं तिघींचही अभिनेत्री होण्याचं बालपणापासूनचं स्वप्न आहे. त्या दोघीही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करतील. जेव्हा आम्ही लहान होतो, तेव्हा फॅमिली गॅदरिंगच्यावेळी आम्ही आमच्या पालकांच्या समोर नाटुकली करायचो आणि शाहरुख खान सर त्यांच्या हॅन्डिकॅमवर आमची ही नाटुकली शूट करायचे. या सगळ्यांची आम्ही नंतर शॉर्ट फिल्म सुद्धा तयार केली होती.'
 

View this post on Instagram
 

#squad


A post shared by Ananya 👩🏻‍🎓💫 (@ananyapanday) on

अनन्याला तिला स्टुडंट ऑफ द इयर 2 सिनेमा कसा मिळाला असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, 'मी एका अभिनेत्याची मुलगी आहे म्हणून मला कोणतीही सूट मिळाली नाही. या सिनेमासाठी इतरांप्रमाणे मलाही ऑडिशन द्यावी लागली. वडिलांच्या ओळखीने मला हा सिनेमा मिळला असला तरीही त्यासाठी मला खूप सारी मेहनतही करावी लागली आणि मी त्यासाठी सुरुवातीपासूनच तयार होते. हा माझा पहिला सिनेमा असून माझा अभिनय सर्वांना आवडेल अशी मी आशा करते.'
 

View this post on Instagram
 

faaavvvess


A post shared by Ananya 👩🏻‍🎓💫 (@ananyapanday) on

अनन्या पांडे, तारा सुतारिया आणि टायगर श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'स्टुडंट ऑफ द इयर 2' आजच रिलीज झाला असून प्रेक्षकांकडून सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमातून अनन्यासोबतच तारा सुतारियानंही बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 10, 2019 10:23 PM IST

ताज्या बातम्या