Home /News /entertainment /

Happy Birthday Ananya Panday: वयाच्या 23 व्या वर्षीचं अनन्या पांडे आहे कोट्यवधी रुपयांची मालकीण

Happy Birthday Ananya Panday: वयाच्या 23 व्या वर्षीचं अनन्या पांडे आहे कोट्यवधी रुपयांची मालकीण

Happy Birthday Ananya Panday: अनन्याचा आज 30 ऑक्टोबरला वाढदिवस (Birthday)असून, तिनं 23 व्या वर्षात पदार्पण केलं आहे.

मुंबई, 30 ऑक्टोबर:  सध्या गाजत असलेल्या आर्यन खान (Aryan Khan) ड्रग्ज प्रकरणात (Drugs) नाव पुढं आल्यानं अनन्या पांडेही (Ananya Panday) चर्चेत आहे. आर्यन खान आणि तिच्या व्हॉटसअ‍ॅपवरील संभाषणाच्या आधारे एनसीबीनं तिचीही चौकशी केली. अनन्या बॉलिवूडमधील नवीन आलेल्या युवा अभिनेत्रींमधील एक आघाडीची अभिनेत्री आहे. 2019 मध्ये करण जोहरच्या (Karan Johar) 'स्टुडंट ऑफ द इयर 2' चित्रपटामधून तिनं बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण केलं आणि अल्पावधीतच प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. अनन्याचा आज 30 ऑक्टोबरला वाढदिवस (Birthday)असून, तिनं 23 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. नवभारत टाईम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे. बॉलिवूडमधील अभिनेता चंकी पांडेची (Chanky Panday) मुलगी असलेल्या अनन्यानं 'स्टुडंट ऑफ द इयर 2' चित्रपटात टायगर श्रॉफ आणि तारा सुतारिया बरोबर काम केलं होतं. त्यानंतर कार्तिक आर्यनसोबत 'पत्नी पत्नी और वो'मध्ये आणि ईशान खट्टरसोबत 'खाली पीली' या चित्रपटात तिनं काम केलं. अनेक जाहिरातींमध्येही (Advertisement) ती झळकली आहे. हेही वाचा-  या मराठमोळ्या अभिनेत्रीने समुद्रकिनारी गुपचूप उरकला लग्नसोहळा, Wedding photo viral चित्रपटसृष्टीत अगदी अल्पावधीतच टॉप सेलिब्रिटीसारखी प्रसिद्ध झालेली अनन्या इतक्या लहान वयातच कोट्याधीश आहे. अनन्याची एकूण संपत्ती सध्या सुमारे 72 कोटी रुपयांची आहे. अगदी कमी वयात तिनं कोट्यवधींची संपत्ती कमावली आहे. अनन्या एका चित्रपटासाठी 2 कोटी रुपये मानधन घेते. याशिवाय अनेक ब्रँड्सच्या जाहिरातींमधूनही ती कोटी रुपये कमावते. अवघ्या दोन-तीन वर्षांत तीन चित्रपट केलेल्या अनन्यानं चाहत्यांची ही मोठी कमाई केली आहे. तिचे लाखो चाहते असून सोशल मीडियावर ती आपल्या चाहत्यांसाठी सतत आपले फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. चाहतेही तिला भरभरून प्रतिसाद देत असतात. हेही वाचा-  'आपल्या मुलांना सांभाळा' Aryan Khan च्या जामीनावर अभिनेते Piyush Mishra यांची प्रतिक्रिया चर्चेत
 कोरोनामुळे (Covid 19) दीड वर्षे ठप्प असलेल्या बॉलिवूडमध्ये आता कामकाज सुरू झालं असून, चित्रपटांच्या शूटिंगलाही वेग आला आहे. त्यामुळे लवकरच नवीन चित्रपटांमधून स्टार्स प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तिला आता चांगले चित्रपट मिळत आहेत तसंच ती आपल्या अभिनयाने एक स्थान निर्माण करून ते पक्कं करत आहे. त्यामुळे ती सध्या निवडक स्क्रिप्टचाच विचार करते. तिच्या हातात आता अनेक स्क्रिप्ट्स (Scripts) आहेत. अनन्या लवकरच तेलुगु सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत 'लायगर' चित्रपटात दिसणार आहे. तसंच ती दिग्दर्शक शकुन बत्रा यांच्या एका चित्रपटात काम करत आहे . यात दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झालेलं नाही.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Ananya panday

पुढील बातम्या