Bigg Boss च्या घरात पॉर्नची मागणी, अभिनेत्रीची जीभ घसरली; पाहा VIDEO

Bigg Boss च्या घरात पॉर्नची मागणी, अभिनेत्रीची जीभ घसरली; पाहा VIDEO

बिग बॉसच्या घरात 'मैं पॉर्न चाहती हूँ' असं म्हणतानाचा तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडीयावर व्हायरल होताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 2 डिसेंबर : अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिचा आगमी सिनेमा ‘पती, पत्नी और वो’च्या प्रमोशनमध्ये बीझी आहे. नुकतीच अनन्या पांडे, कार्तिक आर्यन आणि भूमि पेडणेकर यांनी सलमान खानचा लोकप्रिय रिअलिटी शो ‘बिग बॉस’मध्ये हजेरी लावली. त्यावेळी सलमान खाननं दिलेल्या एका टास्कमध्ये अभिनेत्री अनन्या पांडेची जीभ घसरलेली दिसली. बिग बॉसच्या घरात 'मैं पॉर्न चाहती हूँ' असं म्हणतानाचा तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडीयावर व्हायरल होताना दिसत आहे.

‘पति पत्नी और वो’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी बिग बॉसच्या मंचावर पोहोचलेल्या कार्तिक, अनन्या आणि भूमि यांना सलमाननं एक टास्क दिला होता. ज्यात कानाला हेड फोन लावून हाय व्हॉल्यूम म्युझिक सुरू असताना समोरची व्यक्ती काय बोलत आहे हे त्याच्या लिपसिंक वरून ओळखायचं. यावेळी अनन्याला हेडफोन देण्यात आले आणि नंतर सलमान म्हणाला ‘बिग बॉस चाहते हैं’. मात्र याचं उत्तर देताना अनन्या म्हणाली, ‘मैं पोर्न चाहती हूँ’. अनन्याचं उत्तर ऐकून कार्तिक म्हणाला, ‘हा ती खूप पाहते’ यावर तिथं उपस्थित असलेल्या सर्वांनाच हसू आवरेना.

कधी काळी 5 स्टार हॉटेलमध्ये वेटरचं काम करणारा अभिनेता आज आहे बॉलिवूड सुपरस्टार!

अनन्यानं म्युझिक ऐकताना सलमान काय बोलतो आहे हे ओळखण्याचा 6 वेळा प्रयत्न केला मात्र प्रत्येक वेळी तिनं चुकीचं उत्तर दिलं. मात्र अनन्या काय बोलत आहे हे सलमाननं एकाच प्रयत्नात ओळखलं. यामध्ये सलमान खान सर्वांमध्ये लिपसिंक ओळखण्यात सरस ठरला.

लिव्ह- इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या या 7 जोड्यांनी दुसऱ्यांशी केलं लग्न

याचवेळी कार्तिक आणि भूमि यांच्या दरम्यान एक मजेशीर किस्सा घडला. भूमि कार्तिकला समजावून थकली मात्र त्याला ती काय बोलते आहे हे ओळखता आलं नाही. पण त्यानंतर सलमाननं एकदाच सांगितलं आणि तो काय बोलत आहे हे कार्तिकनं ओळखलं. त्यावेळी सलमान म्हणाला की कार्तिक भूमि पेक्षा सलमानच्या ओठांवर लक्ष देत होता. यावर भूमिन सांगितलं की तो सिनेमातही असंच करतो.

याआधी पति पत्नी और वोची टीम बिग बॉसच्या घरात गेली होती यावेळी त्यांनी घरातील सदस्यांना टास्क दिला होता. ज्यात स्पर्धकांच्या तोंडला काळं फासण्यात आलं.

काय आहे सनी लिओनीच्या हाॅट फिगरचं गुपित, जाणून घ्या तिचा Diet Plan

First published: December 2, 2019, 12:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading