ऊसाच्या शेतात PHOTO काढून फसली अनन्या पांडे; युजर्स म्हणाले, हिचं स्ट्रगल तर...

ऊसाच्या शेतात PHOTO काढून फसली अनन्या पांडे; युजर्स म्हणाले, हिचं स्ट्रगल तर...

अनन्यानं काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत नेपोटिझमवरुन होणाऱ्या टीकेवर उत्तर दिलं होतं.

  • Share this:

मुंबई, 16 जानेवारी : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे पदार्पणात हिट सिनेमा देत सुपरहिट झाली. धर्मा प्रोडक्शनच्या ‘स्टूडंट ऑफ द ईयर 2’मधून अनन्यानं बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं. अर्थात इतर स्टार किड्स प्रमाणे अनन्यालाही नेपोटिझमवरुन टोमणे ऐकावे लागले. पण त्यावर उत्तर दिल्यानं काही दिवसांपूर्वी तिला ट्रोल व्हावं लागलं होतं. तेव्हापासून तिनं काहीही केलं तरीही तिच्या ‘स्ट्रगल’वरुन तिला टार्गेट केलं जातं. नुकताच तिनं इन्स्टाग्राम एक फोटो शेअर केला ज्यामुळे तिला सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे.

अनन्या पांडे सध्या तिच्या अपकमिंग प्रोजेक्टमध्ये बीझी आहे. दरम्यान नुकताच तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. ज्यात ती एका ऊसाच्या शेतात उभी असलेली दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना तिनं लिहिलं, ‘पलट…DDLJ Moment…’ अनन्याचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आणि विशेष म्हणजे या फोटोवरुनही तिला सध्या ट्रोल केलं जात आहे.

लंडनमध्ये कॅब ड्रायव्हरच्या वर्तनानं हादरली सोनम कपूर, वाचा नक्की काय घडलं

 

View this post on Instagram

 

पलट 👋🏻 #DDLJmoment

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday) on

इन्स्टाग्रामपासून ते ट्विटर पर्यंत सगळीकडेच अनन्याला तिच्या स्ट्रगलवरुन टोमणे मारत युजर्स ट्रोल करताना दिसत आहेत. एका युजरनं लिहिलं, ‘हिनं तर या गवतापेक्षा जास्त स्ट्रगल केलं आहे.’ दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, तू शेतात नक्की काय करत आहेस. आणखी एका युजरनं लिहिलं, ‘दीदीला स्वतः चालत जाऊन शेती करावी लागत आहे. खूप स्ट्रगल केलं आहे’ तर दुसऱ्यानं लिहिलं, स्ट्रगलिंग ऑन नेक्स्ट लेव्हल’

कबीर बेदींनी केली चार लग्नं, पहिल्या पत्नीच्या न्यूड फोटोंनी घातला होता धुमाकूळ!

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत नेपोटिझमवरुन होणाऱ्या टीकेवर अनन्यानं उत्तर दिलं होतं. ती म्हणाली, स्टार किड्स असलो तरीही आमचं स्वतःचं वेगळं स्ट्रगल असतं. माझ्या बाबांनी कधीच धर्मा प्रोडक्शनसाठी काम केलं नाही ते कधी कॉफी विथ करणमध्ये नाही गेले. मला सुरूवातीपासूनच अभिनेत्री व्हायचं होतं. तिच्या या वक्तव्यावर अभिनेता सिद्धार्थ चतुर्वेदीनं म्हटलं होतं, जिथे आमची स्वप्न पूर्ण होतात त्या ठिकाणापासून यांचं स्ट्रगल सुरू होतं. या मुलाखतीतनंतर या स्ट्रगलच्या वक्तव्यावरुन अनन्याला ट्रोल केलं जात आहे.

‘कॅज्युअल SEX साठी इच्छुक असशील तर संपर्क कर’, गायिकेनं डिजे डिप्लोला केला मेसेज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 16, 2020 01:01 PM IST

ताज्या बातम्या