मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Ananya Panday 'या' अभिनेत्यासोबत एन्जॉय करतेय सुट्ट्या; Photo मुळे पुन्हा रंगली अफेअरची चर्चा

Ananya Panday 'या' अभिनेत्यासोबत एन्जॉय करतेय सुट्ट्या; Photo मुळे पुन्हा रंगली अफेअरची चर्चा

2021 नंतर आता 2022 सालाचं स्वागतही अनन्या पांडे त्याच अभिनेत्यासोबत करते आहे.

2021 नंतर आता 2022 सालाचं स्वागतही अनन्या पांडे त्याच अभिनेत्यासोबत करते आहे.

2021 नंतर आता 2022 सालाचं स्वागतही अनन्या पांडे त्याच अभिनेत्यासोबत करते आहे.

  मुंबई, 31 डिसेंबर : नववर्ष स्वागतासाठी (Happy new year 2022) जगभरातील नागरिकांनी जय्यत तयारी केली आहे. बॉलिवूडमधील सेलिब्रिटीज (Bollywood Celebrities) देखील नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. मात्र याचदरम्यान बॉलिवूडमधील एक अभिनेता आणि अभिनेत्री जोरदार चर्चेत आले आहेत. ईशान खट्टर (Ishan Khatter) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) हे दोघं सध्या सुट्टयांचा (Vacations) आनंद घेताना दिसत आहेत. अनन्या पांडेनं जंगल सफारी दरम्यानचे फोटो नुकतेच शेअर केले असून, त्यात ईशान आणि अनन्या हे दोघं दिसत आहेत. त्यामुळे या दोघांच्या अफेअरविषयीची चर्चा अधिकच जोर धरू लागली आहे.

  सध्या सगळीकडं नव्या वर्षाच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरु आहे. मात्र अनन्या पांडे आणि ईशान खट्टर हे दोघं सुट्टयांचा आनंद घेताना दिसत आहेत. अनन्यानं सोशल मीडियावर जंगल सफारीचे फोटो शेअर केले असून, त्यातील एका फोटोत तारांकीत आकाश दिसत आहे. विशेष म्हणजे ईशानने असाच एक फोटो सोशल मीडियावरून शेअर केला आहे. यावरून हे दोघं एकत्र सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे हे दोघं त्यांच्यातील नात्याचा खुलासा कधी करणार याकडे त्यांच्या फॅन्सचं लक्ष लागून राहिलं आहे.

  2021 च्या सुरवातीला ईशान आणि अनन्या एकत्र सुट्टयांचा आनंद घेताना दिसले होते. तसेच अनेक फिल्मी पार्ट्या, प्रीमियर शो आणि अन्य इव्हेंट्समध्ये हे दोघं एकत्र दिसत होते.

  ईशान खट्टर आणि अनन्या पांडे या दोघांनी `खाली पीली` या हिंदी चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान या दोघांची जवळीक वाढली होती. हे दोघं एकमेकांचे चांगले मित्रदेखील आहेत. अनन्या आणि ईशान नेहमीच एकमेकांविषयीच्या पोस्ट सोशल मीडियावर (Social Media) शेअर करत असतात. या दोघांमधील नातं आजही कायम असल्याचं बोललं जातं. सध्या ईशान आणि अनन्या नववर्षाच्या (New Year) पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा एकत्र सुट्टयांचा आनंद घेत असून, त्यांनी शेअर केलेले फोटो हे त्याचाच पुरावा असल्याचं मानलं जात आहे.

  हे वाचा - परिणीति चोप्राने मानले सरत्या वर्षाचे आभार! फोटो शेअर करत वेधलं चाहत्यांचं लक्ष

  ऑक्टोबर 2021मध्ये अनन्या पांडे ही नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (Narcotics Control Bureau) रडारवर होती. तिला चौकशीसाठी `एनसीबी`च्या कार्यालयातदेखील बोलवण्यात आलं होतं. त्यावेळी ईशान खट्टर अनन्याला सपोर्ट करत असल्याचं दिसून आलं होतं. ईशान अनन्यासाठी बांद्रा येथे फुलं खरेदी करताना आणि तिला घरी भेटायला जाताना दिसला होता. यावेळी ईशान हा अनन्या आणि तिच्या कुटुंबियांना भेटायला आल्याची पुष्टी सूत्रांनी केली होती.

  First published:

  Tags: Ananya panday, Entertainment