एलईडी पॅंट परिधान करून पार्टीत थिरकली अनन्या पांडे, VIDEO व्हायरल

एलईडी पॅंट परिधान करून पार्टीत थिरकली अनन्या पांडे, VIDEO व्हायरल

अनन्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. आणि यामागचं कारण आहे अनन्याने एलईडी पँट घालून केलेला डान्स.

  • Share this:

मुंबई, 23 फेब्रुवारी : बॉलिवूडमध्ये सध्या स्टार किडची चलती आहे. दिवसेंदिवस अनेक स्टार किड चित्रपटातून डेब्यू करू लागले आहेत. त्यातीलच एक म्हणजे अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे. अनन्या पांडेनी जेव्हापासून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. तेव्हापासून ती सोशल मीडियावर चर्चेत आहे. कधी चित्रपटांमुळे तर कधी सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळे तिची सतत चर्चा असते. आताही अनन्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. आणि यामागचं कारण आहे अनन्याने एलईडी पँट घालून केलेला डान्स.

 

View this post on Instagram

 

Glowin' 🔥 ... ... @ananyapanday ❤️ ❤️ ❤️ @chunkypanday @bhavanapandey #ananya #ananyapanday #PatiPatniAurWoh #KhaaliPeeli #loveananya

A post shared by Ananya ❤️ (@ananyapandayislove) on

अभिनेत्री भूमी पेडणेकरने एका पार्टीच आयोजन केलं होतं. त्या पार्टीमध्ये अनेक बॉलिवूडचे कलाकारही उपस्थित होते. याच पार्टीत अभिनेत्री अनन्या पांडेही आली होती. आणि पार्टीत सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या त्या अनन्याने घातलेल्या एलईडी पँटवर. अनन्या चक्क या पार्टीत एलईडी पँट घालून आली होती. अनन्याने या पार्टीत अभिनेता गोविंदाच्या ‘अखियों से गोली मारे’ या गाण्यावर तुफान डान्स केला. अनन्याचा एलईडी पँटमधील गोविंदा स्टाईल डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनन्याच्या या व्हिडिओला चाहते खूप पसंत करत आहेत.

भूमी पेडणेकरच्या या पार्टीत अनन्यासोबत अभिनेता इशान खट्टरही होता. नुकतच अनन्या पांडेची अभिनेता कार्तिक आर्यन सोबतचा पती पत्नी और वो हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात भूमी पेडणेकरही दिसली होती. प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगली पसंती दिली होती.

अनन्याने स्टुडंट ऑफ द इयर 2 या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.  इंडिया टिव्ही इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अनन्या साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. दिग्दर्शक करण जोहरने ट्विट करत ही माहिती दिली आहे.

First published: February 23, 2020, 4:55 PM IST

ताज्या बातम्या