अनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL

अनन्‍या पांडे आणि सुहाना खानचा नवीन डान्स VIDEO VIRAL

तोंड का लपवतेय सुहाना खान, तिचा अनन्‍या पांडेसोबतचा VIRAL VIDEO पाहिला का?

  • Share this:

मुंबई, 15 जुलै : बॉलिवूड स्टार किड्स सुहाना खान, अनन्या पांडे आणि शनाया कपूर या तिघींचे फोटो सोशल मीडियावर बऱ्याचदा पाहायला मिळतात. या तिघीही एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत, हे त्यांच्या फोटो-व्हिडीओद्वारे समजून येतं. नुकतंच सुहाना आणि अनन्याचा एक नवीन व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. यामध्ये दोघीही डान्स करताना दिसत आहेत. कॅज्युअल आउटफिटमध्ये असलेल्या या दोघी 'मॅजिक रूड'च्या गाण्यावर मज्जा-मस्ती करत थिरकताना दिसत आहेत. सुरुवातीला या व्हिडीओमध्ये सुहाना तोंड लपवताना पाहायला मिळत आहे. पण नंतर दोघींची धम्माल डान्स मस्ती व्हिडीओत दिसत आहे. अन्यया पांडे, सुहाना खान आणि शनाया कपूर बऱ्याचदा एकत्र पार्टी करताना दिसतच असतात.

(वाचा :हृतिक रोशनचा Super 30 या पायरसी वेबसाईटवर झाला लीक)

'या' सिनेमातून अनन्याची बॉलिवूड एण्ट्री

अनन्या सध्या आपल्या आगामी सिनेमांच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. तर शनायानं आपल्या फिल्म प्रॉडक्शनमध्ये गुंतली आहे आणि दुसरीकडे सुहानानं नुकतंच आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे.

(वाचा :....म्हणून या नव्या खासदार बाईंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय)

दरम्यान, अनन्या पांडे लवकरच 'स्‍टुडंट ऑफ द इअर 2' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण करत आहे. यानंतर ती भूमी पेडणेकर आणि कार्तिक आर्यनचा आगामी सिनेमा'पति पत्‍नी और वो'मध्येही झळकणार आहे.

(वाचा : सनी लिओनीच्या घरी पुन्हा हलणार पाळणा? नवऱ्यासोबत फोटो केला शेअर)

सुहाना कधी येणार बॉलिवूडमध्ये ?

किंग खान शाहरुखची लेक सुहानाबद्दल सांगायचं झालं तर तिच्या बॉलिवूड एण्ट्रीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोरदार सुरू आहे. पण अद्यापपर्यंत याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

VIRAL FACT: गोणपाटाच्या कपड्यांची ही विचित्र फॅशन देशभरात नंबर वन!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 15, 2019 09:53 PM IST

ताज्या बातम्या