मुंबई, 07 जुलै: मुंबईसह ( Mumbai Rain) महाराष्ट्रात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. सगळेच पावसाचा आनंद घेत आहेत. मुंबईत पावसाची मज्जा काही ओरच असते पण पाऊस सुरू झाल्यावर मुंबईकरांना भेडसावणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रस्त्यातील खड्डे. अनेक वर्ष मुंबईच्या रस्त्यातील खड्डे बुजवण्याचं काम केलं जात मात्र खड्डे काही मुंबईकरांची पाठ सोडण्याचं नाव घेत नाहीत. पाऊस सुरू झाल्यानंतर मुंबईच्या खड्ड्यांना वैतागलेले मुंबईकर सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. अनेक कलाकारही यावर व्यक्त होत असतात. मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक समीर विद्धांसने (director sameer vidwans) यावेळी मुंबईच्या खड्ड्यांवर उपरोधिक ट्विट केलं आहे. सध्या समीरचं हे ट्विट सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे.
समीर विद्धांसनं ट्विट करत म्हटलंय, 'मुंबईत रस्त्यावर भयानक खड्डे झालेत. अर्थात हे काही नवीन नाही.रोजच्या परवचासारखं प्रत्येक जण एकदा तरी हे म्हणतोच. वर्षानुवर्षे रस्त्यावर खड्डे असणे ह्याला आता 'परंपरा' मानलं पाहीजे, म्हणजे मग ती अभिमानानी जपता येईल! आणि त्यात पाठ, मान, मणका, गाडीची वाट लागणे हे आपलं योगदान ठरेल!' समीर विद्धांसनं शेअर केलेलं हे ट्विट अनेक मुंबईकरांना पटण्यासारखं आहे. कारण गेली अनेक वर्ष पालिकेकडून मुंबईतील रस्त्यांची डागडुजी करण्यात येते. मात्र ऐन पावसाळ्यात रस्त्यांची चाळणी होते. त्यामुळे समीर यांनी म्हटल्याप्रमाणे वर्षानुवर्ष मुंबईत खड्ड्यांची परंपरा आहे असं म्हणायला हरकत नाही. मुंबईत रस्त्यातील खड्डयांमुळे आजवर अनेकांचे जीव देखील गेले आहेत ही बाबही दुर्लक्ष करुन चालणार आहे.
मुंबईत रस्त्यावर भयानक खड्डे झालेत.
अर्थात हे काही नवीन नाही.रोजच्या परवचासारखं प्रत्येक जण एकदा तरी हे म्हणतोच. वर्षानुवर्षे..
रस्त्यावर खड्डे असणे ह्याला आता ‘परंपरा’ मानलं पाहीजे, म्हणजे मग ती अभिमानानी जपता येईल! आणि त्यात पाठ, मान, मणका, गाडीची वाट लागणे हे आपलं योगदान ठरेल!
— Sameer Vidwans । समीर विद्वांस (@sameervidwans) July 7, 2022
समीर विद्धांस मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक आहे. दिग्दर्शक म्हणून काम करत असताना तो अनेक सामाजिक आणि राजकीय विषयावर आपलं मत मांडताना दिसतो. डबल सीट, टाइम प्लिज, आनंदी गोपाळ सारखे उत्तम सिनेमे समीर विद्धांसनं दिग्दर्शित केले आहेत. अनेक सिनेमांसाठी त्याला पुरस्कारही देण्यात आले आहेत. केवळ मराठीच नाही तर समीरं हिंदी सिनेसृष्टीतही आपली छाप पाडली आहे. समीर सध्या बॉलिवूडमध्ये नवीन सिनेमाची तयारी करतोय.
Published by:Minal Gurav
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.