ही पहा 'केबीसी 9'ची पहिली करोडपती

ही पहा 'केबीसी 9'ची पहिली करोडपती

कौन बनेगा करोडपती सिझन 9च्या पहिल्या करोडपती बनल्यात अनामिका मुजुमदार. एक कोटी जिंकल्यानंतर त्या 7 कोटींच्या प्रश्नासाठी क्वालिफाइड झाल्या होत्या. पण उत्तर नीट माहीत नसल्यानं त्या तिथेच थांबल्या.

  • Share this:

04 आॅक्टोबर : कौन बनेगा करोडपती सिझन 9च्या पहिल्या करोडपती बनल्यात अनामिका मुजुमदार. एक कोटी जिंकल्यानंतर त्या 7 कोटींच्या प्रश्नासाठी क्वालिफाइड झाल्या होत्या. पण उत्तर नीट माहीत नसल्यानं त्या तिथेच थांबल्या.

अनामिका दोन मुलांची आई आहे. त्या समाज सेविका आहेत. त्या फेथ इन इंडिया नावाचा एनजीओ चालवतात. त्या एनजीओतर्फे झारखंडमधल्या ग्रामीण भागात काम करतात. एक कोटींचा उपयोग त्या इतरांच्या मदतीसाठी करणार आहेत.

अनामिकाला पंतप्रधान मोदींना भेटायचं. झारखंडच्या महिलांच्या समस्यांबद्दल  त्यांना पत्रही लिहिलंय.

अमिताभ बच्चनना पाहून अनामिका एकदम नर्व्हस झालेल्या. पण प्रश्नांची उत्तरं त्या आत्मविश्वासानं देत होत्या. एक करोडपर्यंत पोचल्यावर त्यांची आई त्यांना आता खेळू नको सांगत होती. पण एक करोडचा प्रश्न त्या खेळल्या आणि जिंकल्याही.

 

First Published: Oct 4, 2017 07:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading