मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Anajali Arora: 'कच्चा बदाम' फेम अंजली अरोराचा MMS लीक? नेमकं प्रकरण काय?

Anajali Arora: 'कच्चा बदाम' फेम अंजली अरोराचा MMS लीक? नेमकं प्रकरण काय?

अंजली अरोरा या सोशल मीडिया स्टारचं नाव सध्या बरंच चर्चेत येत आहे.

अंजली अरोरा या सोशल मीडिया स्टारचं नाव सध्या बरंच चर्चेत येत आहे.

अंजली अरोरा या सोशल मीडिया स्टारचं नाव सध्या बरंच चर्चेत येत आहे.

  • Published by:  Rasika Nanal
मुंबई 10 ऑगस्ट: सध्याचा जमाना हा सोशल मीडिया स्टारचा आहे. अनेक influencer आणि सोशल मीडिया स्टार इन्स्टाग्राम रील्समुळे एका वेगळ्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेले दिसून येतात. यातीलच एक नाव म्हणजे अंजली अरोरा. तिच्या अदांमुळे आणि सोशल मीडिया रील्समुळे अन्जलीने स्वतःची ओळख मिळवली आहे. सध्या तिचं नाव खूप चर्चेत येत आहे. अंजलीचा एक प्रायव्हेट व्हिडिओ लीक झाल्याचा दावा केला जातोय. हा व्हिडिओ प्रचंड viral झाला असून याबद्दल अंजलीकडून कोणतंही स्पष्टीकरण समोर आलेलं नाही. सध्या एक MMS बराच viral होताना दिसत आहे. आणि त्यामध्ये दिसणारी व्यक्ती ही अंजली अरोरा असल्याचा दावा केला जात आहे. सोशल मीडियावर सुद्धा या MMS ची खूप चर्चा होत आहे. या प्रकरणानंतर अनेकजण अंजलीला ट्रोल करताना दिसत आहेत. तर ट्विटरवर अनेकांनी अंजलीला सपोर्ट करत हा तिच्याविरुद्ध केलेला एक कट असल्याचं सांगत आहेत. याबद्दल अंजलीने स्वतः कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीये. News18 लोकमत या गोष्टीची कोणतीही पुष्टी करत नाही. हे ही वाचा- Raju Srivastav Heart Attack: जिममध्ये वर्कआउट करताना प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तवला हृदयविकाराचा झटका अंजली ही एक सोशल मीडिया सेन्सेशन आहे. तिला लाखो करोडोंमध्ये फॅन फॉलोईंग असून एका रीलने तिला मोठा चाहतावर्ग मिळाला. सध्या या प्रकरणामुळे तिच्याबद्दल वेगवेगळी मतं समोर येताना दिसत आहेत.
अंजली वर्क फ्रंटवर सध्या बरीच सक्रिय आहे. कंगना रानौतच्या ‘लॉक अप’ या शोमध्ये अंजली दिसून आली होती. यामध्ये तिचा परफॉर्मन्स सगळ्यांनाच आवडला होता.
तसंच या शोचा विजेता मुन्नावर फारुकीसह तिची मैत्री सुद्धा चांगली झाली होती. तसंच अंजली नुकतीच एका गाण्यात सुद्धा दिसून आली होती. ‘सैय्या दिल में आना रे’ असं या गाण्याचं नाव होतं.
First published:

Tags: Actress, Social media

पुढील बातम्या