News18 Lokmat

जान्हवी कपूरनं लिहिलेली श्रीदेवीवरची कविता ऐकाल तर तुम्हीही व्हाल इमोशनल

गेल्या वर्षी जान्हवी श्रीदेवीबरोबर आली होती. 2018मध्ये श्रीदेवीच्या अचानक झालेल्या निधनामुळे कपूर कुटुंब आजही धक्क्यात आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 24, 2018 10:11 AM IST

जान्हवी कपूरनं लिहिलेली श्रीदेवीवरची कविता ऐकाल तर तुम्हीही व्हाल इमोशनल

मुंबई, 24 नोव्हेंबर : गोव्यामध्ये आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल जोरात सुरू आहे. देशविदेशातले सुंदर सिनेमे फेस्टिवलमध्ये पाहायला मिळतात. या महोत्सवासाठी अनेक स्टार्सही उपस्थित राहतात. यावेळी जान्हवी कपूर आणि बोनी कपूर हजर होते.


गेल्या वर्षी जान्हवी श्रीदेवीबरोबर आली होती. 2018मध्ये श्रीदेवीच्या अचानक झालेल्या निधनामुळे कपूर कुटुंब आजही धक्क्यात आहे. या महोत्सवात जान्हवी कपूरनं आपल्या आईवर लिहिलेली कविता वाचली. तेव्हा बोनी कपूरसकट जमलेले सगळे जण भावुक झाले.


जान्हवीनं लिहिलंय, ' मी माझ्या आईच्या सर्वोत्तम गोष्टी पाहिल्यात. मी तिच्यासारखी होणं इच्छा असून शक्य नाही.'

Loading...
२८ नोव्हेंबरपर्यंत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. यावर्षी यांमध्ये एकूण ६८ देशांच्या विविध भाषांतील एकूण १४४ चित्रपटांचा समावेश आहे. त्यात मुख्य विभाग, भारतीय पॅनोरमा, सिंहावलोकन, शाॅर्ट्स फिल्म, श्रध्दांजली, विशेष विषय असे विविध भाग आहेत. पॅनोरमा विभागात देशातील हिंदीसह विविध प्रादेशिक भाषांचे एकूण २१ चित्रपट आहेत. त्यात प्रतिमा जोशी दिग्दर्शित 'आम्ही दोघी' आणि निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित 'धप्पा ' या दोन मराठी चित्रपटांचाही समावेश आहे.


गेल्या वर्षी पॅनोरमा विभागात एकूण ९ मराठी चित्रपट होते हे विशेषच कौतुकाचे ठरले. यावर्षी पॅनोरमात मल्याळम, तमिळ व बंगाली चित्रपटांची संख्या जास्त आहे.शाॅर्ट्स फिल्म विभागात मराठीची संख्या अतिशय चांगली आहे, तर व्यावसायिक यश विभागात पद्मावत, एक था टायगर अशा यशस्वी चित्रपटांचा समावेश आहे. शशी कपूर, श्रीदेवी, विनोद खन्ना या कलाकारांच्या चित्रपटांचाही एक स्वतंत्र विभाग आहे. महोत्सवात विविध विषयांवर फोकस टाकला जाणार आहे. विदेशी चित्रपटांचाही भरपूर सहभाग आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 24, 2018 10:11 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...