VIDEO : मुलगा की मुलगी? बाळाच्या जन्माआधीच अ‍ॅमी जॅक्शननं केला खुलासा

अ‍ॅमीनं एका पार्टीमध्ये आपल्या बाळाच्या जेंडरचा खुलासा केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 27, 2019 09:50 PM IST

VIDEO : मुलगा की मुलगी? बाळाच्या जन्माआधीच अ‍ॅमी जॅक्शननं केला खुलासा

मुंबई, 27 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेत्री अ‍ॅमी जॅक्सन (Amy Jackson) नऊ महिन्यांची गरोदर आहे. कोणत्याही क्षणी ती गोड बातमी देऊ शकते. असं असलं तरी ती तिचे हे दिवस चांगलेच एन्जॉय करत आहे. स्वतःचे नवनवीन फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर तिने बेबी बंपचे अनेक फोटो शेअर केले आहेत. नुकतंच तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर स्विमींग पूलमधले काही हॉट फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये अ‍ॅमी प्रियकर जॉर्ज पानाइयोटौ (George Panayiotou) सोबत स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसली. त्यानंतर अ‍ॅमीनं एका पार्टीमध्ये आपल्या बाळाच्या जेंडरचा खुलासा केला आहे.

मागच्या काही काळापासून आपल्या प्रेग्नन्सीमुळे चर्चेत असणाऱ्या अ‍ॅमीनं नुकतीच तिच्या खास मित्रमंडळींसाठी एक जेंडर रिव्हिल पार्टी ठेवली होती. ज्यात तिनं आपल्या बाळाच्या जेंडरचा खुलासा केला. बाळाच्या जेंडरच्या खुलासा करतानाचा एक व्हिडीओ अ‍ॅमीनं तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती ब्लू कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तिनं यावेळा एक फुगा फोडला त्यातून निळ्या रंगाची पिसं बाहेर पडली. यावरुन समजतं की ती मुलाला जन्म देणार आहे. कारण सामान्यता पिंक कलर हा मुलींसाठी आणि ब्लू कलर मुलांसाठी वापरला जातो.

बॅक फ्लिप स्टंट करताना पडली दिशा पटानी, VIDEO VIRAL

काही दिवसांपूर्वी अ‍ॅमीनं केलेलं टॉपलेस फोटोशूट चर्चेत राहिलं होतं. हा फोटो शेअर करताना अ‍ॅमीनं प्रेग्नन्सी दरम्यान तिच्या शरीरात होत असलेल्या बदलांविषयी सांगितलं होतं. फोटो शेअर करताना अ‍ॅमीनं कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘ग्रीस!?! नाही मंचकिन आणि मी, उन्हाळ्याचे काही उरलेले दिवस मागच्या बागेत घालवत आहोत. मी ऑफिशिअली प्रेग्नंसीच्या 8 व्या महिन्यात आहे. माझं शरीर, बेबी बंप, स्ट्रेच मार्क्स, वाढलेलं वजन आणि मातृत्वाची प्रत्येक गोष्ट एंजॉय करत आहे.’

'गद्दारी तो आपने सिखाई नहीं', पाहा ऋतिक-टायगरचा अ‍ॅक्शनपॅक War Trailer

अ‍ॅमी जॅक्सन येत्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये तिच्या पहिल्या बाळाला जन्म देईल. तिनं मे महिन्यात बॉयफ्रेंड George Panayioutou याच्याशी साखरपुडा केला आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर George सोबत रोमँटिक फोटो शेअर करत असते. अ‍ॅमी आणि जॉर्ज यांनी अद्याप लग्न केलेलं नसून बाळाच्या जन्मानंतर हे दोघंही लग्न करतील असं बोललं जात आहे. एमीच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर प्रेग्नंसीच्या अगोदर ती अक्षय कुमारसोबत 2.0 या सिनेमात दिसली होती.

KBC 11 : चरणा गुप्ता यांना 1 कोटींच्या प्रश्नासाठी दिलेल्या पर्यायात चूक

==================================================================

VIDEO : धावत्या रिक्षातून विद्यार्थी फेकला गेला बाहेर, तोच उठून पळाला मागे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 27, 2019 02:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...