प्रेग्नंसीच्या 8 व्या महिन्यात ‘या’ अभिनेत्रीनं केलं टॉपलेस फोटोशूट

प्रेग्नंसीच्या 8 व्या महिन्यात ‘या’ अभिनेत्रीनं केलं टॉपलेस फोटोशूट

बॉलिवूडमध्ये अभिनेत्री प्रेग्नंसीच्या काळात स्वतःची नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

  • Share this:

मुंबई, 9 ऑगस्ट : बॉलिवूडमध्ये अभिनेत्री प्रेग्नंसीच्या काळात स्वतःची नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. आजकाल या अभिनेत्री आपला प्रेग्नंसीचा काळ एंजॉय करताना दिसतात. त्या बेबी बंपसोबत कॅमेऱ्यासमोर येतात. सोशल मीडियावर आपल्या प्रेग्नंसी काळातले फोटो शेअर करतात. एवढंच नाही तर प्रेग्नंसीच्या काळात खास फोटोशूटही करतात. काही दिवसापूर्वी अभिनेत्री समीरा रेड्डीनं अंडर वॉटर फोटोशूट केल्यानंतर आता आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीनं प्रेग्नंसीमध्ये चक्क टॉपलेस फोटोशूट केलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री एमी जॅक्सनच्या प्रेग्नंसीची चर्चा मागच्या बऱ्याच काळापासून सुरू आहे. सध्या एमी तिचा प्रेग्नंसी पिरियड एंजॉय करत असून अनेकदा ती सोशल मीडियावर बेबी बंपसोबतचे आपले फोटो शेअर करताना दिसते. पण सध्या तिच्या टॉपलेस फोटोशूटची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे. एमीनं नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे काही टॉपलेस फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

एमीनं केलेल्या या टॉपलेस फोटोशूटमध्ये तिनं फक्त मोठी कॅप घातलेली दिसत आहे. हे फोटो शेअर करताना एमीनं कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘ग्रीस!?! नाही मंचकिन आणि मी, उन्हाळ्याचे काही उरलेले दिवस मागच्या बागेत घालवत आहोत. मी ऑफिशिअली प्रेग्नंसीच्या 8 व्या महिन्यात आहे. माझं शरीर, बेबी बंप, स्ट्रेच मार्क्स, वाढलेलं वजन आणि मातृत्वाची प्रत्येक गोष्ट एंजॉय करत आहे.’

 

View this post on Instagram

 

This little one has been to more places in the last 9 months than I’d been in my first 9 years 😂✈️ #BabyWorldTraveller

A post shared by Amy Jackson (@iamamyjackson) on

 

View this post on Instagram

 

Two Peas on Date Night #ENOBoheme

A post shared by Amy Jackson (@iamamyjackson) on

एमी जॅक्सन येत्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये तिच्या पहिल्या बाळाला जन्म देईल. तिनं मे महिन्यात बॉयफ्रेंड George Panayioutou याच्याशी साखरपुडा केला आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर George सोबत रोमँटिक फोटो शेअर करत असते. एमी आणि जॉर्ज यांनी अद्याप ल्गन केलेलं नसून बाळाच्या जन्मानंतर हे दोघंही लग्न करतील असं बोललं जात आहे. एमीच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर प्रेग्नंसीच्या अगोदर ती अक्षय कुमारसोबत 2.0 या सिनेमात दिसली होती.

==================================================================

VIDEO: 'खायला दिलं पण खायची इच्छा नाही, मला माझा प्रपंच पाहिजे'

Published by: Megha Jethe
First published: August 9, 2019, 9:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading