VIDEO : रेहमानचे सूर निनादले, '2.0'चं पहिलं गाणं लाँच

VIDEO : रेहमानचे सूर निनादले, '2.0'चं पहिलं गाणं लाँच

तू ही रे हे गाणं सिनेमातलं एकमेव गाणं आहे. एमी जॅक्सन यात रोबो लूकमध्ये दिसते. रजनीकांतच्या स्टेप्स बघण्यासारख्या झाल्यात.

  • Share this:

मुंबई, 25 नोव्हेंबर : '2.0'चं काऊंटडाऊन सुरू झालंय. फॅन्सचं लक्ष सिनेमाकडे लागलंय. येत्या शुक्रवारी हा सिनेमा रिलीज होतोय.


सिनेमाचं पहिलं गाणं लाँच झालं. तू ही रे हे गाणं सिनेमातलं एकमेव गाणं आहे. एमी जॅक्सन यात रोबो लूकमध्ये दिसते. रजनीकांतच्या स्टेप्स बघण्यासारख्या झाल्यात.


या गाण्याला संगीत दिलंय ए.आर.रेहमाननं. अरमान मलिक आणि शषा तिरुपती यांचा आवाज आहे. या गाण्यासाठी 20 कोटी रुपये खर्च केलेत. आतापर्यंतचं सर्वात महागडं असं हे गाणं आहे. तामिळ आणि तेलगूमधलं गाणं आधीच रिलीज झालं होतं.
2.0 सिनेमाचं बजेट 400 कोटी इतकं आहे. 2.0 रिलीज होण्याआधीच चित्रपटानं 370 कोटी कमवले आहेत. भारतातील जास्त खर्चिक असलेल्या सिनेमाच्या कमाईसाठी एका पद्धतीचा वापर केला आहे.


2. 0 चित्रपटाचे सॅटलाईट हक्क लाईका प्रोडक्शनने विकले आहेत. साधारण 120 कोटींपर्यंत हे हक्क विकले आहेत आणि सिनेमाच्या डिजिटल हक्कांचे सगळे व्हर्जन (version) 60 करोडोमध्ये विकले असल्याची माहिती मिळाली आहे.


रजनीकांत आणि अक्षय कुमार यांचा बहुचर्चित '2.0' सिनेमा पाच दिवसांनंतर रिलीज होतोय. हा सिनेमा रोबोटचा सीक्वल आहे. त्यामुळे या सिनेमात ऐश्वर्या राय बच्चन असेल अशा बातम्या येत होत्या.


आता नवी बातमी कळलीय. या सिनेमात ऐश्वर्या नाही. पण रजनीकांतची व्यक्तिरेखा वारंवार ऐश्वर्याचा उल्लेख करतं. कारण रोबोटमध्ये ऐश्वर्याची महत्त्वाची भूमिका होती. 2.0चा दिग्दर्शक शंकरनं सांगितलं, हा सिनेमा ऐश्वर्याच्या उल्लेखाशिवाय बनूच शकत नाही. त्यामुळे सिनेमाभर तिच्या व्यक्तिरेखेचा उल्लेख असेल.


या सिनेमाची पोस्टर्स आतापर्यंत शेअर झाली होती. पण आता अक्षय कुमारचा मेकअप करतानाचा एक व्हिडिओ बाहेर आलाय. तो बघून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. एखाद्या अभिनेत्याची मेहनत किती असू शकते, हे यातून समजून येते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 25, 2018 11:21 AM IST

ताज्या बातम्या