मोठी कमाई! स्मिता पाटील यांच्या बहिणीकडून मिळालेली भेट पाहून अमृता सुभाष भावुक

मोठी कमाई! स्मिता पाटील यांच्या बहिणीकडून मिळालेली भेट पाहून अमृता सुभाष भावुक

अभिनेत्री अमृता सुभाष हिला नुकताच सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्म फेअर अवॉर्ड मिळाला. पण तिला यापेक्षा सुंदर भेट दिली ती दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांची बहीण अनिता पाटील यांनी.

  • Share this:

मुंबई, 23 फेब्रुवारी : हिंदी चित्रपटसृष्टीत मानाचा समजला जाणारा फिल्मफेअर पुरस्कारचा वितरण सोहळा काही दिवसांपूर्वीच आसामच्या गुवाहाटीमध्ये पार पडला. दरम्यान, 65व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाष हिला तिच्या दमदार अभिनयासाठी सन्मानित करण्यात आलं. पण अमृताला यापेक्षा सुंदर भेट दिली ती दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांची बहीण अनिता पाटील यांनी. याबाबत अमृता सुभाषनं ट्विटरवरून माहिती दिली.

अभिनेत्री अमृता सुभाषला गल्ली बॉय चित्रपटासाठी उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. अमृता सुभाषने गल्ली बॉय चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट सोबत स्क्रीन शेअर केली होती. दोन दिग्गज कलाकार असतानाही अमृतानं आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली. या पुरस्कार सोहळा पार पडल्यानंतर अनिता पाटील यांनी अमृताला स्मिता पाटील यांची एक ओढणी भेट दिली. ज्यामुळे अमृता सुभाष भावुक झाली. तिनं आपल्या भावना ट्विटर पोस्टमधून व्यक्त केल्या.

'मिस्टर इंडिया'च्या रिमेकवरून भडकली सोनम कपूर, त्यानंतर तिने काय केलं ते पाहा

 

View this post on Instagram

 

Gullyboy got 13 awards at Filmfare.. This film has created record of getting highest awards at Filmfare! So happy and grateful ❤️❤️ गलीबाॅयनं काल आजवर फिल्मफेअरच्या इतिहासांत सर्वात जास्त म्हणजे १३ पुरस्कार मिळवण्याचं रेकाॅर्ड केलं . खूप आनंद आणि कृतज्ञ! @faroutakhtar @zoieakhtar @ranveersingh @aliaabhatt @siddhantchaturvedi @vjymaurya @jiteshpillaai @filmfare #blessed #gratitude #fun #award #filmfare Thank you so much @sardarsinghvirk for capturing this beautiful moment between me Ranveer and sidhdhant.. it’s precious 🌺🌺

A post shared by Amruta Subhash (@amrutasubhash) on

याबाबत आमृतानं तिच्या ट्विटरवर लिहिलं, ‘मी माझ्या भावना शब्दात मांडू शकत नाही. स्मिता ताईंची बहीण अनिता ताई पाटील यांनी मला ही ओढणी फिल्मफेअर अवॉर्ड मिळाल्यानंतर भेट म्हणून दिली. ही ओढण स्मिता ताईंची आहे. अनिता ताईंनी जेव्हा माझा अस्तु सिनेमा पाहिला होता त्यावेळीही अशीच एक ओढणी भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी आता पुन्हा मला आणखी एक ओढणी भेट दिली.’

ग्लॅमरस खासदार मिमी चक्रवर्तींचा पारंपरिक लूक, महाशिवरात्रीचे फोटो केले शेअर

चित्रपटात उत्तम संवाद आणि तरुणांच्या पसंतीस उतरतील अशी रॅप साँग असतानाही अमृतानं आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला. त्यामुळेच 65व्या फिल्मफेअरमध्ये अमृताला 'ब्लॅक लेडी'ची कमाई करता आली आहे. दरम्यान, 65व्या फिल्मफेअरमध्ये झोया अख्तर दिग्दर्शित 'गली बॉय'ने सर्वोत्कृष्ट चित्रपटचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावत तब्बल 13 फिल्मफेअर पुरस्कार आपल्या नावे केले.

रिअल लाइफ सुलतान! वाचा किती आहे बॉलिवूडच्या दबंग खानची संपत्ती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 23, 2020 08:59 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading